एटापल्लीत नक्षल्यांचा पोलिसांना लक्ष्य करुन बॉम्ब स्फोट; जिवितहानी नाही

मनोहर बोरकर
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

एटापल्ली(गडचिरोली) : तालुक्यातील गट्टा पोलिस स्टेशन पासून 500 मीटर अंतरावर वनविभाग कार्यालयाजवळ मुख्य रस्त्यावर नक्षल्यांनी पोलिसांना लक्ष्य करून क्लेमोर बॉम्ब स्फोट घडून आणला आहे. यावेळी पोलिस सतर्क असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.  ​

एटापल्ली(गडचिरोली) : तालुक्यातील गट्टा पोलिस स्टेशन पासून 500 मीटर अंतरावर वनविभाग कार्यालयाजवळ मुख्य रस्त्यावर नक्षल्यांनी पोलिसांना लक्ष्य करून क्लेमोर बॉम्ब स्फोट घडून आणला आहे. यावेळी पोलिस सतर्क असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.  
 
विधानसभा निवडणूकीची रनधूमाळी सुरु असून निवडणूकीवर माओवाद्यांचा बहिष्कार टाकाल आहे. या पार्श्वभूमीने आज (बुधवार) सकाळी 7 वाजता दरम्यान हा प्रकार घडला. गट्टा पोलिसांकडून नक्षल विरोधी शोध मोहीम राबविली जात असतांना वनविभाग कार्यालय जवळून जाणाऱ्या रस्त्यावर नक्षल्यांनी पोलिसांवर हमला करण्याच्या उद्देशाने क्लेमोर बॉम्ब स्फोट घडविला.

वेळीच पोलिसांच्या निदर्शनात आल्याने सतर्क होऊन नक्षल्यांच्या हमल्यापासून बचाव केला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून गट्टा पोलिसांकडून नक्षल विरुद्ध शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxal attack by Claymore Mine Bomb Blast on Police in Ettapalli