esakal | बंदूक सोडली, पुस्तकं वाचली, झाली मॅट्रिक पास; आत्मसमर्पणानंतर नक्षली मुलीचे उजळले भाग्य
sakal

बोलून बातमी शोधा

उजळले भाग्य! बंदूक सोडली, पुस्तकं वाचली, झाली मॅट्रिक पास

उजळले भाग्य! बंदूक सोडली, पुस्तकं वाचली, झाली मॅट्रिक पास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवरी (जि. गोंदिया) : सुमारे तीन वर्षांपूर्वी नक्षल चळवळ सोडण्यापूर्वी १६ वर्षीय रजूला हिडामीवर अर्धा डझनहून अधिक गुन्हे होते. तिने पोलिसांवर गोळीबार करण्यात भाग घेतला होता. आज ती दहावी उत्तीर्ण झाली आहे. तिला ५१.८० टक्के गुण मिळाले असून, महाराष्ट्र पोलिस दलात सहभागी होण्याची इच्छा तिने व्यक्त केली. (Naxal-Gun-Shooting-at-police-Girl-Tenth-Pass-nad86)

रजूला ही मूळची गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील लाव्हारी येथील. तिने गडचिरोलीच्या कोरची-खोब्रेमेंदा-कुरखेडा (केकेडी) दलममध्ये काम केले. रजूलाने २०१८ मध्ये गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी तिला पुन्हा शिक्षण देण्यास मदत केल्याने हे बदल घडले.

हेही वाचा: थक्क करणारा प्रवास! ८० रुपये ते दोन कोटींचा मालक व चार उद्योग

तत्कालीन पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मदतीने नक्षल सेलच्या पोलिसांनी रजूला हिडामी हिला देवरी येथील आदिवासी मुलींच्या शाळा व वसतिगृहात दाखल केले. तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांनी तिच्यासाठी शाळेचे एक किट, बॅग, पुस्तके, सायकल आणि गणवेशदेखील खरेदी करून दिले.

रजुलाच्या डोक्यावरील वडिलाचे छत्र लहानपणीच हरपले. तीन बहीणभावांपैकी सर्वांत लहान रजूलाने जंगलात चरण्यासाठी जनावरांना नेले होते. तिथे नक्षलवाद्यांनी तिचा सेलफोन हिसकावून घेतला आणि दिशानिर्देश विचारण्याच्या बहाण्याने तिला बरोबर घेऊन गेले. नक्षलवाद्यांनी तिला शस्त्रांव्यतिरिक्त वॉकी-टॉकी आणि इतर गॅझेट्स वापरण्याचे प्रशिक्षण दिले. देवरी येथील एका पोलिस कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रजुलाचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यात अनेक अडथळे आले. शाळेतील प्रवेश बंद होते. तिच्याकडे कागदपत्रेसुद्धा नव्हती. तिच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून दिली.

हेही वाचा: ‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज शोध घेऊ नको’

पोलिसच झाले ‘ट्यूशन शिक्षक’

रजुलाच्या आईने दुसरे लग्न केले आहे. ती इतरत्र स्थायिक झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मुलीची काळजी घेण्याचे ठरविले. २०१९ ते २०२१ मध्ये गोंदियात आठवी ते दहावीच्या परीक्षेत तिला मराठी भाषा आणि गणिताशी झगडावे लागले; म्हणून येथील नक्षल सेलमधील कर्मचाऱ्यांनी तिला ‘ट्यूशन शिक्षक’ मदत केली. यामुळे तिच्या अभ्यासात दुप्पट वाढ झाली. ती दहावी उत्तीर्ण झाली. पोलिस दलात दाखल होण्याची तिची इच्छा आहे.

(Naxal-Gun-Shooting-at-police-Girl-Tenth-Pass-nad86)

loading image