कृषी कायद्यांना नक्षलवाद्यांचाही विरोध, पत्रके आढळल्याने उडाली खळबळ

मिलिंद उमरे
Thursday, 11 February 2021

बुधवारी (ता. १०) सकाळच्या सुमारास नक्षलग्रस्त परिसरातील कमलापूर येथील ग्रामपंचायतजवळील रस्त्यावर नक्षलवाद्यांची पत्रके आढळून आली. या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे

गडचिरोली : मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यात आंदोलनाच्या समर्थनात नक्षलवाद्यांनीही भूमिका घेतली आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायतीजवळ पत्रके टाकून त्यात कृषी कायदे रद्द करण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा - पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणात भातखळकरांनी घेतले मंत्र्याचे नाव, 'मुख्यमंत्री 'राठोडगिरी...

बुधवारी (ता. १०) सकाळच्या सुमारास नक्षलग्रस्त परिसरातील कमलापूर येथील ग्रामपंचायतजवळील रस्त्यावर नक्षलवाद्यांची पत्रके आढळून आली. या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे. हे कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहनही केले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) केंद्रीय समितीचा प्रवक्ता अभय, असे नाव या पत्रकावर नमूद आहे. या पत्रकात तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबद्दल शेतकऱ्यांची प्रशंसा करण्यात आली. २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्‍टर रॅलीचेही समर्थन करण्यात आले. विशेष म्हणजे, दिल्ली व देशभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाने इंग्रजांच्या काळात जुलमी रौलेट ऍक्‍टविरोधात झालेल्या आंदोलनाची आठवण ताजी केल्याचेही पत्रकात म्हटले आहे. यासंदर्भात पोलिस विभागाशी संपर्क साधला; मात्र तेथून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naxali opposed to agriculture act by left banner in gadchiroli