गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांची दहशत सुरूच; आणखी एका ट्रकचे नुकसान

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांची दहशत सुरूच; आणखी एका ट्रकचे नुकसान

एटापल्ली (गडचिरोली)- तालुक्यातील सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हेडरी पासून 300 मीटर अंतरावर व विनोबा आश्रम शाळेजवळ ठेवलेल्या लोहखनीज उत्खनन कामावरील ट्रकला (ता. 03) पहाटे दोन वाजता दरम्यान नक्षल्यांनी पेटवून दिले.

सुरजागड लोहखनिज पहाड़ी पासून एक किलोमीटर अंतरावरील हेडरी या गावात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, तथा पोलिस स्टेशन व केंद्रीय राखीव पोलिस दल, अशा हजारो शस्त्रसज्य पोलिसांची रात्र दिवस सुरक्षा तैनाती, काही ड्रोन कैमऱ्यांची करड़ी नजर, अनेक पोलिस खबरे कार्यरत आहेत.

अशा वेळी, नक्षल्यांचा पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी स्थापना दिन सप्ताह दरम्यान हैदोश सुरु असताना पोलिस मात्र बेसावध असल्याने ट्रक जाळला गेल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. त्यामुळे नक्षल्यांकडून मोठी घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यात नक्षल्यांनी दिनांक 30 नोव्हेंबरला गट्टेपल्ली गांव जंगल परिसरात पंतप्रधान ग्राम सड़क निर्माण कार्यावरिल दहा जेसीबी मशीनसह सोळा वाहने पेटवून दिल्यानंतर नक्षल्यांचा पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा 18 वा स्थापन दिवस 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान साजरा करण्याचे आवाहन करणारे व आत्मसमर्पित नक्षल कमांडो पहाड़सिंग विरुद्ध मजकूर छापलेली पोष्टर व ब्यानर सर्वत्र टाकल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून खासगी वाहतूकदारांनी दुर्गम भागातील गट्टा, कसनसुर व जारावंडी मार्गची वाहतूक बंद ठेवली आहे. नक्षल्यांकडून गेल्या चार दिवसांपासून सतत होत असलेल्या हिंसक करवाया व पत्रकबाजीमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com