जहाल महिला नक्षली मुडे हिडमा मडावी हिला अटक

नक्षलवाद्यांकडून सरकारविरोधी कार्यक्रम राबवुन हिंसक कारवाया घडवुन आणत असतात.
Naxalite woman Mude Hidma Madavi arrested gadchiroli
Naxalite woman Mude Hidma Madavi arrested gadchirolisakal

गडचिराेली : २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करीत असतात. या पार्श्वभुमीवर नक्षलवाद्यांकडून सरकारविरोधी कार्यक्रम राबवुन हिंसक कारवाया घडवुन आणत असतात. याच दरम्यान बुधवार (ता. ३) पाेिलसांनी जहाल महीला नक्षली मुडे हिडमा मडावी हिला अटक केली आहे. बुधवारी पोलिस उपविभाग एटापल्लीअंतर्गत नाकाबंदी करण्यात आली असता, एक महिला संशयीतरित्या आढळून आल्याने जवानांनी महिला पोलीसांमार्फत तिची अधिक चौकशी केली असता तिने सोबत बाळगलेल्या साहित्यावरुन ती जहाल महीला नक्षली मुडे हिडमा मडावी कसनसूर दलम सदस्य असल्याचे समजले.

त्यावरून जवानांनी तिला ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे , अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख , पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अटक करण्यात आलेली जहाल महिला नक्षली ही कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत असुन ती छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरिता महाराष्ट्र शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तिचा किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलिस दल करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com