माओवाद्यांनी केली पं. स. सदस्याची हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

सिरोंचा (जि. गडचिरोली) : सिरोंचा तालुक्‍याच्या सीमेलगत असलेल्या भोपालपट्टनम गावात माओवाद्यांनी जगदीश कोंड्रा नामक जिल्हा परिषद सदस्याची हत्या केली. ही घटना सोमवारी (ता. 26) रात्री घडली. ते भाजपचे पदाधिकारी होते.

बीजापूर जिल्ह्यातील भोपालपट्टनम गावात सोमवारी रात्री आठच्या सुमारास पंचायत समिती सदस्य जगदीश कोंड्रा मित्रासोबत घरासमोर बसून होते. त्याच सुमारास पाच माओवाद्यांनी त्यांना घेरून कुऱ्हाड व चाकूने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर माओवादी जंगलात पळून गेले. जखमी जगदीशला उपचारासाठी सिरोंचा येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. जगदीश कोंड्रा काही वर्षांपूर्वी कंत्राटदाराचे काम करीत होते. रस्त्याचे काम करू नका, अशी माओवाद्यांनी धमकी दिल्याने त्यांनी काम सोडले होते. ते पंचायत समिती सदस्य होते. यापूर्वी ते जिल्हा परिषद सदस्य होते. एटापल्ली येथे काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य केवल सावकार अतकमवार यांचीही त्यांच्या घरी माओवाद्यांनी हत्या केली होती.

Web Title: Naxlite murdered politician

टॅग्स