विदर्भ कुणाचा बालेकिल्ला नाही हे दाखवून द्या - सुनील तटकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

नागपूर - सरकारचे चुकीचे आणि शेतकरीविरोधी धोरण नागरिकांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक जास्त जागा आपल्या निवडून आल्या पाहिजे. विदर्भ कुणाचा बालेकिल्ला नाही. येथे कुणाची मक्‍तेदारी नाही, हे दाखवून द्या, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.  

आमदार निवास येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपूर विभागीय मेळावा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग राष्ट्रवादी काँग्रेसने उपराजधानीतून फुंकले. या वेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार, विधानसभेचे गटनेते जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, हेमंत टकले, राजेंद्र जैन, प्रकाश गजभिये, जयदत्त क्षीरसागर, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, रमेश बंग, धर्मराव आत्राम आदी उपस्थित होते. 

तटकरे म्हणाले, शेतमालाला वाढीव हमीभाव देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. सरकारमध्ये आल्यावर मात्र काहीच दिले नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची साधी दखलही घेतल्या जात नाही. महागाई कमी झाली नाही. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे.

सरकारचे सर्व चुकीचे धोरण नागरिकांना सांगा. त्यांचा नाकर्तेपणा जनतेच्या समोर मांडा. लोकांमध्ये मिसळा, विश्‍वास निर्माण करा, असे आवाहनही त्यांनी केले.  या वेळी गजभिये यांनी पवार यांना बुद्धमूर्ती भेट दिली.

जिल्हास्तरावर आघाडीचा निर्णय - पटेल
‘नेते आगे बढो’ नको म्हणा. नेते समोर गेल्यावर मागे कुणीच नसते. नेते नको तर पक्ष  समोर गेला पाहिजे. काँग्रेससोबत आघाडी झाल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले. आघाडीचा निर्णय स्थानिक स्तरावरच घेण्याचे अधिकार देण्यात यावे, अशी सूचना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. विदर्भासाठी स्वतंत्र कार्यालय देऊन सर्व कारभार येथून चालविण्यात यावा, अशीही सूचना त्यांनी केली.

Web Title: ncp campaign in nagpur