दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

अकोला - या देशात पुन्हा मनुस्मृतीचे राज्य आणण्याचा प्रयत्न सुरू असून, महिला व मुली असुरक्षित आहेत. महिलांची सुरक्षितता आणि स्वातंत्र्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी रस्त्यावर उतरत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी शुक्रवारी (ता. 6) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे 17 जुलै रोजी नागपूर येथे संविधान बचाव, देश बचाव रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीच्या नियोजनासाठी त्या येथे आल्या असता पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत पिसे पाटील, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस मंदा देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

त्या म्हणाल्या, ""महिलांसाठी या देशात सुरक्षित वातावरण नाही. त्यांच्या अधिकारावरच गदा येत आहे. लोकशाही धोक्‍यात आहे. काय खायचे, कसे राहायचे, काय बोलायचे याचे अधिकारही काढून घेतले जात आहेत. विरोध केल्यास धमक्‍या व हत्या करण्याचे प्रकार सुरू आहे. ही एक प्रकारे अघोषित आणीबाणीच आहे. महिलांच्या अधिकारासाठी राष्ट्रवादीच्या महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. नागपूर येथील आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेते सहभागी होणार आहेत.'' 

Web Title: NCP women's street on the second freedom fight