एनडीआरएफच्या पथकाने बक्षिसाची रक्कम दिली केरळ पूरग्रस्तांसाठी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पूर्णा नदी पात्रात 20 तास शोध मोहीम राबविणाऱ्या पथकाला बुलढाणा अर्बन ने देऊ केलेली अकरा हजार रुपयांची बक्षीस रक्कम शोध पथकाने नाकारून ती केरळ देवभूमी साठी देण्याचे सांगितले. त्या वरून बुलढाणा अर्बन ने सदर धनादेश मुख्यमंत्री रिलीफ फंडाचे नावाने दिला आहे.

संग्रामपूर (बुलढाणा)- पूर्णा नदी पात्रात 20 तास शोध मोहीम राबविणाऱ्या पथकाला बुलढाणा अर्बन ने देऊ केलेली अकरा हजार रुपयांची बक्षीस रक्कम शोध पथकाने नाकारून ती केरळ देवभूमी साठी देण्याचे सांगितले. त्या वरून बुलढाणा अर्बन ने सदर धनादेश मुख्यमंत्री रिलीफ फंडाचे नावाने दिला आहे.

तालुक्यातील खिरोडा पुलाखालून पुराचे पाण्यात बुलढाणा अर्बन जळगाव जामोद शाखे मध्ये कार्यरत राजेश चव्हाण पत्नी व मुलासह 22 ऑगस्टच्या सायंकाळी वाहून गेले होते. या कुटूंबाच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी बुलढाण्याच्या शोधपथकाला (NDRF) पाचारण करण्यात आले होते.

तिघांचा शोध शक्य तितक्या लवकर लागावा यासाठी बुलढाणा अर्बन कडून डॉ. किशोर केला यांनी कर्मचारीही कामाला लावले होते. तीनही मृतदेह शोधल्या बद्दल बुलढाण्याचे पथकाला बुलढाणा अर्बन कडून अकरा हजार रुपये बक्षीस देऊ केले होते. मात्र सदर पथकाने बक्षिसाची ही रक्कम नाकारून केरळ मधील पुरग्रस्ताचे मदती साठी देण्याचे सांगितले. त्या वरून बुलढाणा अर्बन कडून तसा धनादेश तयार करण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: NDRF squad paid prize money to Kerala flood victims