
आज दुपारी 2 ते 5 या वेळेत ही परीक्षा होणार असून परीक्षेचे नियोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे करण्यात येत आहे. ही परीक्षा 720 गुणांची राहणार असून 180 प्रश्न राहतील.
साडेसात हजार विद्यार्थी आज देणार नीट परीक्षा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 21 परीक्षा केंद्रे
अमरावती : वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा व प्रवेस परीक्षा (नीट) आज होणार आहे. या परीक्षेसाठी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील 7 हजार 421 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. कोविड 19 च्या सुरक्षात्मक उपाययोजनांमध्ये 21 परीक्षा केंद्रे त्यासाठी तयार करण्यात आली आहेत.
आज दुपारी 2 ते 5 या वेळेत ही परीक्षा होणार असून परीक्षेचे नियोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे करण्यात येत आहे. ही परीक्षा 720 गुणांची राहणार असून 180 प्रश्न राहतील. कोरोनाच्या पार्श्वभमीवर यापूर्वी तीनवेळा या परीक्षेचे वेळापत्रक बदलविण्यात आले आहे.
मे, जून, जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे परीक्षा रद्द करण्यात आली. आता आज ही परीक्षा होत असून जिल्ह्यातील अमरावती, वरुड, चांदूरबाजार, धामणगाव आणि यवतमाळ आदी ठिकाणी 21 केंद्रांवरून ही परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायजरचा वापर अत्यावश्यक करण्यात आला आहे. परीक्षाकेंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी सकाळी 11 पासून विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रात प्रवेश दिल्या जाणार आहे.
दुपारी 1.30 पर्यंत प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहणार असून एका वर्गात केवळ 12 विद्यार्थ्यांना बसविले जाणार आहे. वर्गात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमानसुद्धा सुरुवातीलाच मोजण्यात येईल. यामध्ये कोणाला कोरोनाची लक्षणे दिसताच आयसोलेशन हॉलमध्ये संबंधित विद्यार्थ्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
हेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..
प्रवेशपत्रासह शासनाचा कोणताही ओळखपुरावा, मास्क, सॅनिटायजर, वैध छायाचित्र असणारा ओळखपुरावाही कागदपत्रे परीक्षाकेंद्रात आवश्यक राहणार आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
Web Title: Nearly 17 Thousand Students Will Give Neet Exam Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..