मामाचा खून करणाऱ्या भाच्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

समुद्रपूर (जि. वर्धा) : घरगुती वादातून भाचाने मामाचा खून केल्याची घटना समुद्रपूर परिसरात घडली. या घटनेनंतर फरार असलेला भाचा कमलेश मोरे याला पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील जयताळा परिसरातून अटक केली. घटनेच्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पत्नीला शिवीगाळ केली म्हणून भाचाने गुरुवारी मामा भोजराज रामचंद्र झोडापे (वय 45) याला धारदार चाकूने भोसकून त्याचा खून केला. घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी काही तासांतच आरोपी कमलेश मोरे याला अटक केली.

कमलेशने दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. तो मामाकडेच परिवार घेऊन राहत होता. मात्र, मामाने त्याला दोन महिन्यानंतर तू रुम पहा व कोणतेही काम कर, असा सल्ला दिला. यातूनच ही खुनाची घटना घडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nephew arrested for murdering uncle