दारुड्या भाच्याने केला आत्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भाच्याचा मुलासारखा सांभाळ करणाऱ्या आत्याचा भाच्याने क्षुल्लक कारणावरून खून केला. ही घटना नंदनवन परिसरात उघडकीस आली.

नागपूर -आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भाच्याचा मुलासारखा सांभाळ करणाऱ्या आत्याचा भाच्याने क्षुल्लक कारणावरून खून केला. ही घटना नंदनवन परिसरात उघडकीस आली. मालाबाई अनिल कुंभरे (४५, रा. देवळी, जि. वर्धा) असे मृताचे तर राजा देवीदास पंधराम (३२) असे आरोपीचे नाव आहे.

राजाला आईवडील नसून मालाबाईने पालनपोषण केले. मोठा झाल्यानंतर राजाला दारूचे आणि इतर व्यसन जडले. तो नीट वागवत नसल्याने मालाबाई नेहमीच रागावत होती. शनिवारी पवनशक्तीनगर येथे नातेवाइकाकडे लग्न होते. त्यामुळे मालाबाई व राजा हे लग्नाला आले होते. लग्न आटोपल्यानंतर नातेवाइकांनी राजाला ‘तू असा का वागतोस’ असे बोलले होते.  मालाबाईनेदेखील त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राजाला राग आला होता.

सकाळी लग्न लागल्यानंतर रात्री सर्वजण मांडवात झोपी गेले. मालाबाईदेखील इतर महिलांसोबत झोपी गेली. 

रविवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास सर्वजण झोपेत असताना राजाने मालाबाईच्या छातीवर चाकूने वार करून ठार केले. त्यानंतर तो घटनास्थळाहून पळून गेला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून राजाचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Nephew killed aunt in Nagpur