सायबर क्राईम रोखण्यासाठी लवकरच येणार विशेष ॲप; अमरावतीत गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती  

New app will be launched to decrease cyber crime said Anil deshmukh
New app will be launched to decrease cyber crime said Anil deshmukh

अमरावती ः डिजिटल माध्यमांच्या आधारे अनेक गुन्हे घडत असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस विभागालाही तशा पद्धतीची सक्षम यंत्रणा उभे करणे गरजेचे आहे. गुन्हा सिध्दतेचे प्रमाण वाढविण्यासाठी तपास यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिले.

गुन्हेगार व गुन्ह्यांची माहिती अपडेट राहण्यासाठी डेटा सेंटर मुख्यालयात निर्माण करण्यात यावेत. डिजिटल माध्यमांचा वापर करून विविध प्रकारचे फसवणूकीचे प्रकार वाढले आहे. यावर कारवाई करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची सहकार्य घेऊन फसवणूकीच्या प्रकरणांत तांत्रिक शोधपध्दती विकसित करावी. यासाठी पोलिस विभागाने हैदराबाद व औरंगाबाद पोलिस विभागाच्या धर्तीवर माहिती तंत्रज्ञान विभागाची मदत घेऊन विशेष ऍप तयार करावे. सायबर क्राईम संदर्भात जनतेमध्ये अधिकाधिक जनजागृती करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\

येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मंथन हॉलमध्ये जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्था संदर्भात गृहमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, शहर पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलिस निरीक्षक (ग्रामीण) हरीबालाजी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, राज्य राखीव पोलिस बल गट क्र.9 चे समादेशक हर्ष पोद्दार, प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. डी. गिते, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आर. टी. सराफ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह पोलिस विभागाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात अवैध रेती वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे. यावर आळा घालण्यासाठी पोलिस विभागाने मध्य प्रदेश राज्यसिमा तसेच रेती वाहून येणाऱ्या मार्गावर चेकपोस्ट निर्माण करून कडक तपासणी करावी. शासनस्तरावर मंजूरीसाठी पाठविलेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या प्रस्तावांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल. पोलिस स्टेशनसाठी नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलबध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त, अधीक्षकांचा सन्मान

रिअल हिरो म्हणून पुरस्कार प्राप्त पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह व राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त पोलिस अधीक्षक हरीबालाजी एन. यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मोबाईल चोरी व सायबर क्राइमचा शोध लावून सुमारे 54 लाख रुपयांची फसवणूक उघड करणारे पोलिस कर्मचाऱ्यांचा सुद्धा यावेळी त्यांनी सन्मान केला. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com