नव्या दमाने निवडणुकीला सामोरे जा

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार

उमरेड (जि. नागपूर): आपण लोकसभा निवडणुकीत जरी पराभूत झालो असलो तरी, तो आपला अंतिम पराजय नाही, तेव्हा आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नव्या ताकदीने, नव्या दमाने कामाला लागा आणि पुन्हा महाराष्ट्रात कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
उमरेड नगरीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. राजेंद मुळक म्हणाले, कॉंग्रेसचा आमदार नसल्याने उमरेड मतदारसंघ मागील दहा वर्षांत विकासात मागे पडला. येथे कोणताच मोठा प्रकल्प आला नाही, यामुळे बेरोजगारी वाढली, असे मत व्यक्त केले. यावेळी किशोर गजभिये, राजू पारवे यांनी मार्गदर्शन केले. संचालन मधुकर लांजेवार, आभार राजेश भेंडे यांनी मानले. कार्यक्रमाला जितेंद्र गिरडकर, बाळू इंगोले, केतन रेवतकर, राकेश नौकरकर, मंगेश गिरडकर, रितेश राऊत, अनिरुद्ध चचाणे, प्रकाश मोहोड, अमित लाडेकर, राहुल हुलके, संजय वाघमारे, धीरज यादव यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com