नव्या बस ऑपरेटरचा धांगडधिंगा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

नागपूर - शहर बसच्या नव्या ऑपरेटरकडून योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने सर्व बसचालकांनी मोरभवनमध्ये गर्दी केली. परिणामी महाराजबाग, धिरन कन्या शाळेजवळून नियमित सुटणाऱ्या बसेसच्या प्रतीक्षेत अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर महापालिकेच्या परिवहन विभागाने बसेस सोडण्यासंबंधी चारही ऑपरेटरला योग्य ठिकाणांची यादीच दिली. 

नागपूर - शहर बसच्या नव्या ऑपरेटरकडून योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने सर्व बसचालकांनी मोरभवनमध्ये गर्दी केली. परिणामी महाराजबाग, धिरन कन्या शाळेजवळून नियमित सुटणाऱ्या बसेसच्या प्रतीक्षेत अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर महापालिकेच्या परिवहन विभागाने बसेस सोडण्यासंबंधी चारही ऑपरेटरला योग्य ठिकाणांची यादीच दिली. 

स्टार बस चालविणाऱ्या जुन्या वंश निमय कंपनीचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर नव्या चार ऑपरेटरने शहर बस वाहतुकीचा ताबा घेतला. परंतु, गेल्या चार दिवसांपासून कधी मार्गावरून तर कधी बस सोडण्याच्या ठिकाणांची योग्य माहिती न मिळाल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. याचा फटका नागपूरकरांनाही बसत आहे. शिवाय केवळ 158 बसेस सद्यःस्थितीत धावत आहेत. तोकड्या बस संख्येमुळेही दररोज ये-जा करणाऱ्या चाकरमाने, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यात ऑपरेटरने नव्या बसचालकांची नियुक्ती केली. त्यांना बसच्या मार्गाचीही माहिती नाही. बर्डीवरून शहराच्या इतर भागात जाणारी प्रत्येक बस मोरभवन येथूनच सुटत असल्याचा ग्रह नव्या बसचालकांनी केला. त्यामुळे मोरभवनमध्ये बसची गर्दी झाली. त्याचवेळी महाराजबाग, धिरन कन्या शाळा, भगिनी मंडळ, मुंजे चौकातून नियमित सुटणाऱ्या बसेस दिसून येत नसल्याने प्रवाशांचेही हाल सुरू आहेत. महापालिकेच्या नजरेत ही बाब येताच आज परिवहन विभागाचे व्यवस्थापक जगताप यांनी चारही ऑपरेटर्सना पत्राद्वारे बर्डीतून बस सुटण्याचे विविध ठिकाण, मोरभवनमधून सुटणाऱ्या बसेसची माहिती दिली. 

येथून सुटणार बस 
मोरभवनच्या प्लॅटफार्म पाचवरून बर्डी ते डिफेन्सच्या सर्व फेऱ्या, प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरून बर्डी ते कामठी, प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरून बर्डी ते हिंगण्याच्या बसेस सुटतील. मोरभवन दोन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून खापरखेडा, कोराडी, सुरादेवी मार्गावरील सर्व बस सुटतील. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून पिपळा फाटा, वडद, बनवाडी या मार्गावरील बसेस सुटतील. महाराजबागजवळील स्थानकावरून कन्हान, नारा, नारी, यशोधरानगर, नागसेनवर, जरीपटका, शांतीनगर, पारडी, उमीया धाम, भरतवाडा, कळमेश्‍वर, गोधनी, गोरेवाडा, बेसा, नरसाळा, बहादुरा फाटा, शेषनगर, गोंडखैरी, दाभा, वडधामना, खडगाव, सोनेगाव, धिरन कन्या शाळेजवळून बुटीबोरी, इंडोरामा, मोरारजी मिल, मिहान, सीआरपी कॅम्प, बेलतरोडी (रामेश्‍वरी व नरेंद्रनगर मार्गे), सोनेगाव (छत्रपतीनगर, लक्ष्मीनगर मार्गे) येथून बस सुटतील. 

Web Title: new bus in city

टॅग्स