मूत्र शिंपडण्यावरून नवा वाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नागपूर : अवनी वाघिणीची शिकार बेकायदेशीर केल्याचा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) आपल्या अहवालात ठेवल्याने सर्वत्र खळबळ उडाली असताना आता तिला आकर्षित करण्यासाठी वाघाचे मूत्र वापरासाठी दोन अधिकाऱ्यांनी फक्त व्हॉट्‌सऍपने संदेशाची देवाण-घेवाण झाली होती. त्यातही स्पष्ट होकार किंवा नकार कळविण्यात आला नव्हता. याविषयी ई-परमिशन असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. तर सहभागी व्हा याचा अर्थ होकार असा काढण्यात आल्याचे समोर आले आहे. यावरून कसेही करून अवनीला मारायचेच असेच सर्वांनी ठरविले होते असा निकर्ष काढल्या जात आहे.

एनटीसीएच्या अहवालात वाघिणीला आकर्षित करण्यासाठी मूत्राचा वापर करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याबद्दलची परवानगी होती की नाही याबद्दल कोणताही उल्लेख अहवालात नाही. याबाबत चौकशी केली असता वाघिणीचे मूत्र संबंधित वन क्षेत्रात शिंपडण्याची लेखी परवानगी नसल्याचे उघडकीस आले आहे. महाराजबागेचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षकांनी सदर वाघिणीला पकडण्यासाठी 29 ऑक्‍टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत मदत करण्याची विनंती केल्याचे पत्र आहे. मात्र, वाघिणीचे मूत्र टाकून तिला आकर्षित करण्याची लेखी परवानगी नव्हती. ई-मेलवर यासंदर्भातील संदेशांची देवाणघेवाण झाली होती. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांना चंद्रपूर येथील दहा वर्षांपूर्वी एका वाघिणीला मूत्राच्या साहाय्याने आकर्षिक केल्याबद्दलचा व्हॉट्‌सऍप मॅजेस बावस्कर यांनी पाठविला होता. लिमये यांनी यास व्हॉट्‌ऍपवरूनच सहभागी व्हा असे उत्तर दिल्याचे बावस्कर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. सहभागी व्हा म्हणजे काय? याचा सविस्तर उल्लेख एनटीसीएच्या अहवालात नाही. बावस्कर यांनी याविषयी ई-परमिशन मिळाल्याचे म्हटले आहे. या संदर्भात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. वाघीण माजावर (हिट) आली तरच आकर्षित होत असते. ही वाघीण बछड्यासोबत असल्याने आकर्षित होण्याची शक्‍यताच नाही असेही काही वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. यामुळे वाघिणीच्या मूत्र शिंपडण्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: New dispute on sprinkling urine