अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा "लूक' बदलणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा "लूक' बदलणार
नागपूर : महापालिकेतील अग्निशमन विभागाचे कर्मचारी, अधिकारी अन्‌ खाकी गणवेश, असे अनेक वर्षांपासूनचे सूत्र आता बदलणार आहे. स्वातंत्र्यदिनापासून अग्निशमन विभागातील कर्मचारी व अधिकारी नव्या गणवेशात दिसून येणार आहेत.

एखाद्या दुर्घटनेदरम्यान खाकी रंगाच्या गणवेशामुळे अग्निशमन अधिकारी, पोलिस यांच्यातील फरक स्पष्ट होत नव्हता. त्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण राज्यात अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अग्निशमन जवान, अधिकाऱ्यांचा गेल्या अनेक दशकांपासून असलेला खाकी गणवेश इतिहासजमा होणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून अग्निशमन अधिकारी पांढरा शर्ट व नेव्ही ब्ल्यू रंगाच्या पॅंटमध्ये दिसून येणार आहेत. कर्मचारी आकाशी रंगाचा शर्ट व नेव्ही ब्ल्यू रंगाचा पॅंट परिधान करणार आहेत. येत्या 15 ऑगस्टला नव्या रंगात पथसंचलन करताना अधिकारी, कर्मचारी दिसणार आहेत. या नव्या रंगाबाबत महापालिका सभागृहाने मंजुरी दिली होती. त्यानंतर रंग बदलण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडेही पाठविला होता. नवा गणवेश उत्तम असला तरी खाकी रंगामुळे वेगळाच प्रभाव दिसून येत होता, अशी चर्चा करताना अग्निशमन कर्मचारी दिसून येत आहेत. अग्निशमन विभागात 155 अधिकारी व कर्मचारी आहेत. सर्वच नव्या "लूक'मध्ये दिसणार आहेत.

Web Title: new dress for fire brigade worker