esakal | तिथीचा अट्टहास नडला, नवदाम्पत्याला बसला फटका... वाचा काय आहे प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Newly Married couple quarantined by the police

बहुतांश जणांना कोरोना विषाणूचे गांभीर्य कळले नाही, हेच आजघडीला दिसून येते. असाच काहीसा प्रकार आंबेतलाव येथे घडला.

तिथीचा अट्टहास नडला, नवदाम्पत्याला बसला फटका... वाचा काय आहे प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव (जि. गोंदिया) : कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने आंबेतलाव गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. संचारबंदी लागू करण्यात आली. तरीही कुठल्याही परिस्थितीत नववधू घरी आणण्याचे वर व त्यांचे कुटुंबीयांनी ठरवले. मध्य प्रदेशात जाऊन विवाह आटोपला. मात्र, परतीच्या वेळी पोलिसांनी त्यांना गावसीमेवर गाठले. सर्वांना क्वारंटाइन करीत गुन्हा दाखल केला. हा प्रकार रविवार, 24 मे रोजी घडला.

कोरोना विषाणूने गोंदिया जिल्ह्यातही आपले पाय घट्ट केले आहेत. रुग्णसंख्या पन्नासच्या घरात येऊन पोहोचल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. बाधित रुग्ण ज्या गावात आढळत आहेत, त्या गावांना कंटेन्मेंट झोन तर आसपासची गावे बफर झोन म्हणून घोषित केली जात आहेत. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हेही दाखल केले जात आहेत. असे असताना बहुतांश जणांना कोरोना विषाणूचे गांभीर्य कळले नाही, हेच आजघडीला दिसून येते. असाच काहीसा प्रकार आंबेतलाव येथे घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी आंबेतलाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये आंबेतलाव येथे प्रतिबंधात्मक उपाययोजनेनुसार, गाव कंटेनटमेंट झोन घोषित करण्यात आले. तरी मुलाचे लग्न नियोजित तारखेला पार पाडण्याचे मुलाचे वडील आणि कुटुंबीयांनी ठरविले. नियोजित तारखेला वर काही जणांना घेऊन रविवारी (ता. 24) पोलिसांची नजर चुकवूत वधू मंडपी पोहोचला.

केवळ 20 मिनिटात मुंबई पोलिसांनी वाचवले कोलकात्याच्या तरूणीने प्राण... वाचा हा थरार

लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर सायंकाळी नवरदेव नववधूला आंबेतलाव येथे घेऊन येताच पोलिसांनी त्या तिघांविरोधात कंटेन्मेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस पाटील किशोर खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नववधू, नवरदेव व वरपित्याला गावातच क्वारंटाइन करण्यात आले. पोलिस निरीक्षक सुरेश नारनवरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार अरुण ईलमे, तिलगाम तपास करीत आहेत.

 
आनंदावर विरजण


तीस वर्षीय युवकाने स्वतःच्या लग्न सोहळ्याचे स्वप्न पाहिले होते. ते साकार करण्यासाठी वडील तसेच ज्येष्ठ मंडळींच्या संमतीने लग्नाची तारीख ठरवली. पण, हे स्वप्न कोरोनाने उद्‌ध्वस्त केले. धूमधडाक्‍यात बॅण्डच्या तालावर मित्र, नातलग गावकरी यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार न पाडता वडिलांना सोबत घेऊन लग्न केले. मात्र, नवरदेव वधू आणि वडिलांना गावातील सेंटरवर क्वारंटाइन व्हावे लागले.  

loading image