नव्या वर्षासाठी ताडोबाची बुकींग झालीय? मग ही बातमी वाचाच

राजेश रामपूरकर
Wednesday, 30 December 2020

दोन दिवसांवर ३१ डिसेंबर आला असून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी पर्यटनस्थळी भटकंती करण्यास पसंती दिली आहे. विशेष म्हणजे नागपूर, मध्यप्रदेशतील थंड हवेच्या ठिकाण आणि अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पातील रिसॉर्ट पर्यटकांनी आरक्षित केलेले आहेत.

नागपूर : नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी नागरिकांचे नियोजन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यटन स्थळी जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे योजले. पेंच, बोर, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पासह इतरही ठिकाणचे रिसॉर्ट आणि हॉटेल्सचे आरक्षण फुल्ल झाले आहे. परंतु, पर्यटन स्थळांवर देखील संचारबंदी कायम केल्याने आरक्षण केलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. 

हेही वाचा - ED कारवाईत सुसाट, मात्र गुन्हे सिद्ध करण्यात नापास; पाहा रिपोर्टकार्ड

दोन दिवसांवर ३१ डिसेंबर आला असून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी पर्यटनस्थळी भटकंती करण्यास पसंती दिली आहे. विशेष म्हणजे नागपूर, मध्यप्रदेशतील थंड हवेच्या ठिकाण आणि अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पातील रिसॉर्ट पर्यटकांनी आरक्षित केलेले आहेत. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांनुसार पर्यटन सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने नागरिकांनी पर्यटन स्थळांवर भटकंती करण्यास पसंती दिल्याने गेल्या महिनाभरापासून सर्वच पर्यटन स्थळी गर्दी होत आहे. कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खासगी फार्म हाउससह रिसॉर्टवरील गर्दीवर लक्ष केंद्रित केले आहेत. नियमांचे पालन होत आहे की नाही यावर करडी नजर ठेवण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत असे एका रिसॉर्ट संचालकांनी सांगितले. दरवर्षी पेंच, ताडोबा-अंधरी, नवेगाव- नागझिरा, पचमढी, पन्ना, बांधवगड, चिखलदरा, उमरेड-कऱ्हांडला, शेगाव अशा ठरावीक ठिकाणीच पर्यटकांची पसंती असते. यंदाही तीच स्थिती आहे. 

हेही वाचा - मनपाच्या कचऱ्याला कॉंग्रेसचा विरोध ! शहर कॉंग्रेसचे आंदोलन : घनकचरा संकलनाची निविदा...

मात्र, राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. ग्रामीण भागातही त्याच वेळेनुसार संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रिसॉर्ट, स्टे होम परिसरात रात्रीचे सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमावर निर्बंध आणले असून रात्री दहा वाजेपर्यंतच कार्यक्रम घेता येणार आहे. त्यामुळे अनेकांनी ते कार्यक्रम देखील रद्द केले आहेत, असे ऑलीव्ह रिसोर्टचे संचालक चंद्रपाल चौकसे यांनी 'सकाळ'ला सांगितले. पेंच व्याघ्र प्रकल्पातील नक्षत्र रिसॉर्टचे संचालक कैलाश जोगानी म्हणाले, पर्यटकांचा ओढा जंगलाकडे वाढल्याने दोन तारखेपर्यंत रिसॉर्ट हाउस फुल्ल आहे. 

हेही वाचा - कैमूल गावात इलेक्‍ट्रॉनिक काट्याऐवजी जुन्याच मापाने...

पर्यटकांचे हिरमोड  -
महापालिका क्षेत्रात संचारबंदी लागू केल्याने अनेक नागरिकांनी पर्यटन स्थळी जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे नियोजन केले होते. परंतु, ग्रामीण भागातही संचारबंदी लागू झाल आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीबाबत काढलेल्या परिपत्रकानुसार, पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दीचा ओघ वाढण्याचे संकेत लक्षात घेता या पर्यटन स्थळांवर तसेच संबंधित परिसरात रात्री फिरण्यास, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यास मज्जाव करण्यात आला असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: night curfew at tadoba and pench tiger reserve