निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाचा ‘पाणी प्रश्‍न’ पेटला; शेतकरी झाले आक्रमक

dnyanganga prakalp
dnyanganga prakalp

पोरज (जि. बुलडाणा) : खामगाव तालुक्यातील निमकवळा येथील ‘निम्न’ ज्ञानगंगा प्रकल्प- 2 बहुत लघुपाटबंधारे योजनेतील गेट द्वारे सोडण्यात येत असलेला पाणी प्रवाहचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी आणि पाटबंधारे विभागात चांगलीच जुंपली आहे. याबाबत (ता.24) निमकवळा येथील शेतकरी महेंद्रसिंग राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार दिली. गेट खालील शेतकऱ्यांना व वरील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. मात्र, त्यामधील राठोड मोबदला मिळण्यापासून वंचित असल्यामुळे शेतकऱ्यांनी जेसीबी द्वारे माती टाकून गट. क्र.225 मधून कोणतीही परवानगी न घेता शेती संपादीत न करता बेकायदेशीरपणे शेतामध्ये खोद काम करून गेटचे पाणी तांदुळवाडी ऊनई बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान होत आहे. तरीही बेकायदेशीर सोडण्यात येत असलेले पाणी त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा स्वतः पुढाकार घेऊन पाणी बंद करावे लागेल.

कुटुंबियासोबत आत्मदहनाचा इशारा
संबंधित प्रशासनाकडून प्रशासकीय दमदाटी सुद्धा या शेतकऱ्याची करण्यात येत असल्याचे रोठोड यांनी सांगितले. होत असलेल्या अन्ययाबाबत कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी तक्रारीत देण्यात आला. बेकायदेशीर जाणारे पाणी अडविण्यात आले आहे. मंगळवारपासून शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचे गेट द्वारे सोडत असलेले पाणी अडवले आहे. प्रकल्पाच्या गेटद्वारे कालव्यात सोडल्या जाणारे पाणी शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीमधून सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. दरम्यान, एका वर्षापासून शेतकऱ्याला पाटबंधारे विभाग मोबदला देण्याचे आश्वासन देत आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मोबदला रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे प्रकरण चांगलेच चिघळले आहे.

दबाव तंत्रामुळे शेतकरी संतप्त!
पाणी सोडण्याच्या कामास प्रारंभ करताना चांगलाच तणाव निर्माण झाला. शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली. मोबदला न देता पाणी सोडण्यास प्रारंभ झाल्यास शेतकऱ्यांनी सामूहिक प्रांणत्याग आंदोलनाचा इशारा दिला. यामध्ये महेंद्रसिंग राठोड, योगेश इंगळे, तेजाबसिंग इंगळे, शेषराव भोसले, शब्बीर बागवान, अब्दुल बागवान एका वर्षापासून खोटी आश्वासने पाटबंधारे विभागाचे अधिकारी देत असल्यामुळे शेतकरीही आंदोलनांमध्ये सहभागी आहेत.

गुन्हा दाखल करण्याच्याही मिळत आहेत धमक्या
प्रकल्पाद्वारे सोडण्यात येत असलेले गेट द्वारे बेकायदेशीरपणे पाणी माझ्या मालकी हक्काच्या शेतातून जात आहे. तरी मोबदला अदा करण्यात आलेला नाही. आता मोबदला न देता दबावतंत्राचा आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात आहे. न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील.
-महेंद्रसिंग राठोड, प्रकल्पग्रस्त शेतकरी निमकवळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com