कॉपी करण्यासाठी ‘त्या’ मुलीस परीक्षा केंद्रावर विशेष सुविधा; कारण जाणून थक्क व्हाल!

Exam.jpg
Exam.jpg

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : परीक्षा केंद्रावर मुख्याध्यापक यांच्या दालनात एक विद्यार्थिनी उत्तर पत्रिका सोडवत असल्याचे चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाले. देऊळगाव मही येथील नामांकित विद्यालयात बारावीच्या परीक्षा केंद्रात एका राजकीय व्यक्तीच्या मुली विशेष सवलत देण्यात आल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली नसून शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कॉपीमुक्ती अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे.


तालुक्यातील देऊळगाव मही येथे एका नामांकित खासगी संस्थेच्या शाळेत बारावीच्या परीक्षा केंद्रात आज केमिस्ट्रीचा पेपर होता. या केंद्रावर पेपर सोडण्याची वेळ संपून गेल्यावर एका राजकीय व्यक्तीच्या मुलीस मुख्याध्यापकांच्या कॅबिनमध्ये उत्तर पत्रिका सोडविण्यासाठी देण्यात आली असा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे. या गैरप्रकाराबाबतचा व्हिडिओ सायंकाळनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली. 

गडगंज फी घेऊन मिळते सुविधा
काही खासगी संस्था विद्यार्थ्यांकडून गडगंज फी घेऊन विद्यार्थ्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देत असल्याची चर्चा पण आहे. देऊळगाव मही येथील परीक्षा केंद्रावर आज घडलेल्या कॉपीच्या या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर काही विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांच्या कॅबिनमध्ये बसून एक विद्यार्थिनी पेपर सोडवत असल्याचे व्हिडिओ दाखविले आहे. या व्हिडिओत पेपर सोडवत असलेली विद्यार्थिनी एका माजी सभापतीची मुलगी असल्याचे बोलल्या जात आहे. 

चित्रफित व्हायरल; सर्वत्र चर्चा
चित्रफित व्हायरल झाल्याने तालुक्यात खरोखरच कॉपीमुक्त अभियान सुरू आहे की, कॉपीमुक्तीतून काही संस्थांना वगळण्यात आल्याचे निर्देश शिक्षण विभागाने काढले की, काय अशी शंका उपस्थित होत आहे. वृत्त लिहीपर्यंत विशेष कॉपीच्या या प्रकाराबद्दल पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली नव्हती. तर देऊळगाव मही येथील नामांकित संस्थेमध्ये घडलेल्या कॉफीच्या याप्रकाराची सर्वत्र चर्चा होती.

...तर संपर्क होऊ शकला नाही
संबंधित शाळेवरील परीक्षा केंद्र संचालकांशी संपर्क करून घडलेल्या गैर प्रकाराबद्दल त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा वारंवार प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी स्विच ऑफ असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com