‘आठ’ तारखेचा ‘नाट’ : यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत विजेचे नऊ बळी

‘आठ’ तारखेचा ‘नाट’ : यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत विजेचे नऊ बळी

यवतमाळ : पावसाळ्यासह अवकाळी वातावरणात नेहमीच विजेचा धोका (Danger of lightning in the rainy season) संभवतो. वीज कोसळून (Death by lightning) नागरिकांना जीवही गमवावा लागतो. दोन महिन्यांत नऊ जणांचा बळी (Nine killed in two months) विजेने घेतला आहे. प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने मृतांच्या वारसांना मदत मिळू शकलेली नाही. मात्र, निधी मागणीसाठी प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. (Nine-people-died-in-two-months-in-Yavatmal-district)

शेतशिवारात काम करणारे मजूर, शेतकरी व गुराखी यांना विजेमुळे जीव गमवावा लागतो. शेतशिवारात विजांचा कडकडाट सुरू होताच बचाव करण्यासाठी सुरक्षित जागा मिळत नाही. मग शेतकरी, मजूर एखाद्या झाडाचा आधार शोधतात. लोकांचा घोळका एकाच ठिकाणी राहत असल्याने त्याच ठिकाणी कडकडाटासह वीज कोसळते.

‘आठ’ तारखेचा ‘नाट’ : यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत विजेचे नऊ बळी
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; दुसऱ्या दिवशीही मुसळधार

विजेपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायला हवी याबाबत नेहमीच प्रशासनाकडून जनजागृती केली जाते. मात्र, वीज कोसळत असताना सुरक्षित जागा उपलब्ध राहीलच याची कोणतीही शाश्‍वती नसते. परिणामी विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिक झाडांच्या खालीच थांबतात आणि येथेच घात होत असल्याचे दिसून येते.

गेल्या वर्षी एक जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत वीज पडून दोघांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या वारसाला प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली होती. २०२१ या वर्षातील आठ एप्रिल, आठ मे व आठ जून या तारखांनाच सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ‘आठ’ तारखेचा ‘नाट’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आठ एप्रिल रोजी राळेगाव तालुक्यातील वडजई येथे वीज पडून शेवन पवार या पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. बाभूळगाव तालुक्यातील कोंढा येथील शाम दरेकार, आर्णी तालुक्यातील लोणीतील नामदेव राठोड, झरीतील वेडद येथील दिलीप गाडगे, उमरखेड तालुक्यातील गांजेगाव येथील पुजाराम वाडेकर, दिग्रस तालुक्यातील झिरपूरवाडीतील बबन नाटकर यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. आठ) गजानन घोडे (रा. सावरगाव, ता. कळंब), अशोक व्यवहारे (रा. किन्ही) व सुखदेव कायझरे (रा. येरद शरद) यांचा मृत्यू झाला आहे.

‘आठ’ तारखेचा ‘नाट’ : यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत विजेचे नऊ बळी
देवा... मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता रेऽऽ

मागच्या वर्षी ११ जण गेले वाहून

मागच्या वर्षी एक जून ते एक ऑगस्ट या कालावधीत ११ जण वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यात घाटंजी तालुक्यातील दोन, पुसद तालुक्यातील एक, नेर तालुक्यातील एक, वणी तालुक्यातील चार, बाभूळगाव तालुक्यातील एक, दिग्रस तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.

(Nine-people-died-in-two-months-in-Yavatmal-district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com