Nip of alcohol hidden in the footrest of a Suzuki moped
Nip of alcohol hidden in the footrest of a Suzuki moped

"एकच प्याला'साठी काहीपण, दारू वाहतुकीसाठी लढवली अनोखी शक्‍कल

चिमूर (जि. चंद्रपूर) : जिल्ह्यात दारूबंदी असल्यापासून अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दारूच्या बॉटल्स लपविण्याकरीता अनोखी शक्कल लढविली जाते. अशाच प्रकारे चिमूर येथील अवैध दारू विक्रेत्याने चक्क सुझुकी मोपेडच्या फूट रेस्टच्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या विदेशी दारूच्या निपा चिमूर पोलिसांनी जप्त केल्या. तसेच मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले.

चिमूर पोलिस स्टेशनअंतर्गत लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर मोठ्या प्रमाणात देशी तसेच विदेशी दारूची विक्री सुरू आहे. याविरोधात चिमूर पोलिस कार्यवाही करीत असून अनेकदा अवैध दारू विक्रेत्याने माल कुठे लपविला, याचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागते. चिमूर परिसरात अवैद्य दारूविक्रेते वेगवेगळी शक्कल लढवून स्वतःच्या वाहनाने देशी-विदेशी दारू आणून विक्री करीत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांची संशयितावर नजर होती. पोलिसांनी आपल्या चाणाक्ष नजरेने विक्रेत्याला अचूक हेरले.

चिमूर शहरातील गुरुदेव वॉर्डातील धनंजय बिंगेवार याने त्याच्या सुझुकी मोपेड क्र MH 34 BS 8866 मधील फूट रेस्टमध्ये विदेशी दारूचा मुद्देमाल लपवून पिंपळनेरी मार्गाने येत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार चिमूर पोलिसांनी सापळा रचला. तपासणी केली असता गाडीच्या फूटरेस्टमध्ये 26 नग विदेशी दारूच्या निपा आढळल्या. आरोपीला प्राप्त दारू व मोपेड असा 78,900 रुपयांच्या मुद्देमालासह अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

ही कारवाई मा. उपविभागीय पोलिस अधिकारी तारे, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोहवा विलास निमगडे, पोशी सचिन गजभिये, विनायक सरकुंडे यांनी पार पाडली. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने दारुडे वेगवेगळी शक्‍कल लढवून दारूची अवैधरीत्या वाहतूक करतात. परंतु पोलिसांना त्यांचे फंडे माहिती असल्याने अवैध दारूविक्रीचा भंडाफोड करण्यास पोलिसांना वेळ लागत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com