विकासकामांत "काड्या' कराल तर याद राखा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

विकासकामांत "काड्या' कराल तर याद राखा
नागपूर : वंजारीनगर जलकुंभ ते अजनी रेल्वे पुलापर्यंतचा रस्ता विकास आराखड्यात नमूद आहे. यात अडथळा आणणे योग्य नाही. विकासकामांत काड्या कराल तर याद राखा, असा इशारा देत नितीन गडकरी यांनी आज रेल्वे अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

विकासकामांत "काड्या' कराल तर याद राखा
नागपूर : वंजारीनगर जलकुंभ ते अजनी रेल्वे पुलापर्यंतचा रस्ता विकास आराखड्यात नमूद आहे. यात अडथळा आणणे योग्य नाही. विकासकामांत काड्या कराल तर याद राखा, असा इशारा देत नितीन गडकरी यांनी आज रेल्वे अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
महापालिकेत घेतलेल्या विकासकामे, विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री बोलत होते. त्यांनी त्यांच्या "स्टाइल'ने रेल्वे अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. वंजारीनगर जलकुंभ ते अजनी रेल्वे पुलापर्यंत प्रस्तावित रस्त्यात शाळा येत आहे. तेथे अंडरपास देण्यात येईल. मात्र, या प्रस्तावित रस्त्याच्या मध्यभागी रेल्वेने काहीतरी बांधकाम करून कामात अडथळा निर्माण केल्याचे माजी महापौर प्रवीण दटके यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. यावर गडकरी यांनी या रस्त्यातील अडथळा दूर करा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दात रेल्वे अधिकाऱ्यांना सुनावले. विकासकामात काड्या करणे सोडून द्या, असे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी तातडीने योजना तयार करून निविदा काढण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांना दिले. रेल्वे अधिकाऱ्यानी अडथळा आणल्यास सांगा, त्यांचे काय करायचे ते मी बघतो, अशी सूचनाही त्यांनी केली. गड्डीगोदाम येथील गुरुद्वारा भूमिगत गटार योजनेमध्ये जर काही अडचणी असेल तर त्या तातडीने दूर कराव्या. या कामासाठी रेल्वे तातडीने नाहरकत द्यावे, असेही निर्देश त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. यशवंत स्टेडियम ते पंचशील चौक परिसरात प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर, केळीबाग रोड व बाजार आणि अंबाझरी ओपन थिएटरचे सादरीकरण नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आले. यात त्यांनी काही सूचना केल्या.

.......
नासुप्रलाही सुनावले
नासुप्रचा वर्धमानगरातील मॉल, स्विमिंग पूल आदी प्रकल्प बंद पडले आहे. यावरून केंद्रीय मंत्र्यांनी नासुप्रलाही सुनावले. तातडीने मॉल, स्विमिंग पूल सुरू करा अन्यथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ते अधिग्रहीत करेल, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: nitin gadkari race and rail news