नितीन गडकरी म्हणतात, ई-लायब्ररीतून अटलजींसारखे विद्यार्थी घडेल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नागपूर : महानगरपालिकेच्या माध्यमातून बजेरियासारख्या भागात तयार होणाऱ्या "ई-लायब्ररी'तून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

नागपूर : महानगरपालिकेच्या माध्यमातून बजेरियासारख्या भागात तयार होणाऱ्या "ई-लायब्ररी'तून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
लिकेतर्फे बजेरियातील लाल शाळेत "ई लायब्ररी'च्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. वाचनालयाच्या माध्यमातून भविष्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. या लायब्ररीतून भविष्यात उत्कृष्ट दर्जाचे इंजिनिअर, वैज्ञानिक, डॉक्‍टर तयार होतील. नागपूरचा विकास हा केवळ रस्ते, उद्याने यापुरता मर्यादित नाही तर चौफेर व्हायला हवा. त्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा या सर्व क्षेत्रातील विकास आवश्‍यक आहे. वाचनालयामध्ये दिव्यांगांनाही महत्त्व देण्यात येणार आहे. दिव्यांगांना आवश्‍यक त्या सोयीसुविधा यामध्ये अंतर्भूत असणार आहेत, ही प्रशंसनीय बाब असल्याचे गडकरी म्हणाले.
यावेळी गडकरींनी बजेरिया भागात उद्यान तयार करण्यासाठी खासदार निधीतून निधी देण्याची घोषणा केली. प्रास्ताविकातून ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी "ई-लायब्ररी' तयार करण्यामागील पार्श्‍वभूमी सांगितली. या लायब्ररीला आयआयटी खरगपूरशी जोडल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी पूर्ण सहकार्य मिळेल. लायब्ररीमध्ये ब्रेल लिपी असणाऱ्या संगणकाचा समावेश केल्याचे गडकरी म्हणाले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव या लायब्ररीला देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari says, e-library will become a student like Atalji