esakal | ग्रामपंचायत निवडणूक : सहा तालुक्यातून एकाही उमेदवाराने भरला नाही नामांकन अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

no candidate file nomination form from six taluka of amravati

बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली आहे. परंतु, शुक्रवार, शनिवार तसेच रविवारी सार्वजनिक सुट्टी येत आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक : सहा तालुक्यातून एकाही उमेदवाराने भरला नाही नामांकन अर्ज

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : ग्रामपंचायत निवडणुकीत बुधवारी (ता.23) पहिल्या दिवशी 19 उमेदवारांनी नामांकन  अर्ज दाखल केले, तर सहा तालुक्‍यांतून एकही नामांकन दाखल झाले नाही.

जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला होत आहे. बुधवारपासून नामांकनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 19 अर्ज दाखल झाले. अमरावती तालुक्‍यात 3, तिवसा 4, दर्यापूर 1, मोर्शी 1, अंजनगावसुर्जी 2, अचलपूर 2, चांदूरबाजार 5, असे नामांकन दाखल झालेत, तर वरुड, धारणी, चिखलदरा, नांदगावखंडेश्‍वर, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे या तालुक्‍यांमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही. 30 डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे.  

हेही वाचा - बाजारात स्टूल टाकून रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी वसंतदादा पाटलांनाच दिला होता धक्का

दरम्यान, सरपंचपदाचे आरक्षण नंतर जाहीर होणार असल्याने सरपंचपदाचा उमेदवार कोण? याबाबत अनेक ठिकाणी संभ्रम आहे. या पार्श्‍वभूमीवर पॅनेलची स्थापना सुरू आहे. त्यात सर्वसमावेशक उमेदवारांचा शोध सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. 

हेही वाचा - यशोगाथा :  शिकता शिकता फुलवली शेती, सेंद्रिय...

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या -
अमरावती 46, भातकुली 36, तिवसा 29, दर्यापूर 50, मोर्शी 39, वरुड 41, अंजनगावसुर्जी 34, अचलपूर 44, धारणी 35, चिखलदरा 23, नांदगावखंडेश्‍वर 51, चांदूररेल्वे 29, चांदूरबाजार 41, धामणगावरेल्वे 51.

हेही वाचा - Video : टार्गेट २०२१ : नये सालमें कुछ अच्छा होगा!...

सोमवारपासून येणार गती -
बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली आहे. परंतु, शुक्रवार, शनिवार तसेच रविवारी सार्वजनिक सुट्टी येत आहेत. निवडणूक कार्यक्रमात सार्वजनिक सुट्टी वगळून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असा उल्लेख असल्याने सोमवारपासून खऱ्या अर्थाने या प्रक्रियेला वेग येईल, असे मानले जात आहे.