"ती' 21 गावे अद्यापही अंधारलेली 

"ती' 21 गावे अद्यापही अंधारलेली 

एटापल्ली  - नक्षलग्रस्त, अतिदुर्गम एटापल्ली तालुक्‍यातील 21 गावांमध्ये स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतरही वीज पोचली नाही. मागील दीड वर्षापासून चार ग्रामपंचायत क्षेत्रांतील 40 हून अधिक गावांतील वीजपुरवठा वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे खंडित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व गावांत वीज पोचल्याचा दावा केला होता. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील गावांनी वीज नसल्याची पोलखोल केली आहे. 

एटापल्ली तालुक्‍यात विविध ग्रामपंचायत क्षेत्रातील कारका (खुर्द), सिनभट्टी, मानेवारा, जाजावंडी, पुसकोटी, भूमकान टोला, अंजीगड, गोरगट्टा, झारेवाडा, वाळवी, गुडंजुर, जवेली खुर्द, मुरेवाडा, वाघेझरी (मसाज), गडरी, वेळमागड, नैनगुडा, कोरनार, कारका (बुज.), देवपाडी, कुंडुम, अशा 21 गावांतील नागरिकांनी आजपर्यंत विद्युत रोषणाई कशाला म्हणतात, हे पाहिलेच नाही. दुसरीकडे 40 गावांत वीज खांब लागले, मात्र वीजपुरवठा सुरू झालाच नाही. यामध्ये ग्रामपंचायत गट्टा, गर्देवाडा, वांगेतुरी, जवेली, नागुलवाडी, मेड्री अशा सहा ग्रामपंचायत क्षेत्रातील रेगादंडी, कचलेर, कुकेली, हेटळकसा, रामनटोला, पिपली, बुर्गी, पुस्के, वटेली, बटेर, गोडमेट्टा, कोइनवर्षी, गिलनगुडा, मोहन्दी, येळदळमी, बेसेवाडा, नैताला, मुरेवाडा, हाचबोडी, मर्दकुई, रेकलमेट्टा, हिक्‍केर, हिन्दूर, तोळगट्टा, डोडूर, लाटजोरा, वांगेतुरी, घनपाडी, कुदरी व नैनवाडीसह चाळीस पेक्षा जास्त गावांचा समावेश आहे. या गावांत डीपी पोचली, मीटरही लागले; पण वीजपुरवठा खंडित आहे. 

""गट्टा व इतर ग्रामपंचायत परिसरातील खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. तालुक्‍यातील 21 गावांत सौरऊर्जा उपकरणे वितरित केली जात आहेत. येत्या काही दिवसांत खंडित असलेल्या ठिकाणी विजेची जोडणी केली जाईल.'' 
- सत्यराज वावरे, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण विभाग, एटापल्ली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com