आता वाहनांच्या नोंदणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही

No longer need to be present for vehicle registration
No longer need to be present for vehicle registration

अकोला :  बीएस ४ व बीएस ६ या वाहनांची नोंदणी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याची गरज नाही. कोरोना व्हायरसचा संसर्गाच्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मोटर वाहन कायदा १९८८ कलम ४४(५) मध्ये नोंदणीसाठी नोंदणी अधिकाऱ्याच्या समक्ष हजर करण्याची आवश्यकता नाही. वाहनांची नोंदणी जलद व्हावी यासाठी राज्यातील वाहन वितरकांकडून मोठ्या प्रमाणावर विनंती करण्यात आल्याने त्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. 

वाहन वितरकांनी वाहन ४.० वरील होमोलोगेशन पोर्टलवर नोंद असलेल्या चासिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे वाहन विक्रेत्याने ऑन-लाईन अर्ज, फॉर्म क्रमांक २०,२१, विमापुरावा व पत्त्याचा पुरावा (वितरकांनी प्रमाणित करून) सादर केल्यास, वाहन नोंदणीसाठीचा अर्ज स्विकारावा, वाहन वितरकांना सदर अर्जाची स्कॅन कॉपी कार्यालयाच्या ई-मेलवर सादर करण्यास कळवावे. अशा वाहनांचे नोंदणी शुल्क व कर, वाहन ४.० प्रणाली वर भरून घेऊन, सदर अर्जास मोटर वाहन निरीक्षक व नोंदणी अधिकाऱ्याने संगणकावर मान्यता द्यावी, वाहन वितरकांनी अर्ज सादर करतेवेळी, त्यांनी सर्व कागदपत्रे तपासली असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे व सदर प्रमाणपत्रा सोबत वाहनाच्या चेसिस क्रमांकाची पेन्सिल प्रिंट व छायाचित्र कार्यालयाच्या ई-मेल पत्त्यावर पाठवावे, वाहन वितरकांनी वरील प्रमाणे अर्ज सादर करतेवेळी एक हमीपत्र सादर करावे. त्या हमीपत्रात ‘कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे मी वाहन नोंदणीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्विकारण्याची विनंती करीत आहे.

या नोंदणी संदर्भाने सर्व कायदेशीर जबाबदारी माझी असेल. ऑनलाइन वाहन नोंदणीची ही सवलत संबंधित शहरातील लॉकडाऊन आदेश मागे घेण्याच्या दिनांका पर्यंतच आहे, याची मला जाणीव आहे. ही सर्व वाहने शक्य तितक्या लवकर विभागाचे मोटर वाहन निरीक्षक यांचे समक्ष ‘प्रत्यक्ष तपासणीसाठी’ हजर करण्याची मी हमी घेत आहे. मोटर वाहन निरीक्षकांकडून प्रत्यक्ष तपासणी होईपर्यंत तसेच नोंदणी अधिकाऱ्याकडून लेखी परवानगी मिळेपर्यंत मी सदर वाहने, वाहन मालकाच्या ताब्यात देणार नाही. उपरोक्त तसेच नोंदणी अधिकाऱ्यांनी या संदर्भाने दिलेल्या कोणत्याही निर्देशांचे मी पालन न केल्यास, माझे व्यवसाय प्रमाणपत्र रद्द होऊ शकते तसेच माझ्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते, याची मला जाणीव आहे, असे प्रमाणपत्र वितरकांना सादर करावे लागणार आहे.

ऑनलाइन प्रणालीवरील वाहनांना कागदपत्र सादर करण्याची गरज नाही
जी वाहने वाहन ४.०० या प्रणालीवर ऑनलाईन आहेत व त्यांची कागदपत्र वैध आहेत, त्यांनी कोणतेही कागदपत्र सादर करणे आवश्यक नाही. तसेच इतर कार्यालयात नोंद असलेल्या वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ज्या ईमेलवरुन अर्ज केला आहे त्या ईमेल पत्त्यावर परवानगी प्रमाणपत्र अग्रेषित केले जाईल. याबाबत अतिरिक्त माहिती हवी असल्यास नागरिक दूरध्वनी क्रमांक (०२५३-२२२९००५) या क्रमांकावर मदत व मार्गदर्शन घेऊ शकतात, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी म्हटले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com