
अविनाश साबापुरे
यवतमाळ : बोगस शालार्थ आयडी प्रकरणाने राज्याचा शिक्षण विभाग हादरून गेला आहे. आता मात्र शालार्थ आयडीची संपूर्ण प्रक्रिया शिक्षकाच्या नियुक्तीवेळीच पूर्ण केली जाणार आहे. शिक्षक नियुक्तीच्या पवित्र पोर्टलवरच ही प्रक्रिया होणार असल्याने ‘खवैय्या’ यंत्रणेला चाप लागणार आहे.