esakal | ना खड्ड्यांची ओरड, ना परवानगीसाठी झुंबड.. नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह.. पण कशाचा? वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

No rush for ganesh fesival mandal this year in Amravati

दहाही पोलिस ठाण्याच्या स्तरावर सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले. आतापर्यंतच्या मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रस्त्यावर खड्डे पडल्याने मिरवणूका खड्ड्यातून काढायच्या काय? असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना विचारल्या जायचा.

ना खड्ड्यांची ओरड, ना परवानगीसाठी झुंबड.. नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह.. पण कशाचा? वाचा 

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती :  सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये दरवर्षी रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर असतो. परंतु यावर्षी मुख्य रस्ते सिमेंट झाले, शिवाय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक गोष्टींना ब्रेक बसलाय. त्यामुळे खड्ड्यांची ओरड नाही किंवा संबंधित विभागात परवानगीसाठी झुंबड उडालेली दिसत नाही.

दरवर्षी आयुक्तालयाच्या स्तरावर गणेशोत्सवाच्या पंधरा दिवसांपूर्वीच सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची एक किंवा दोन बैठका होतात. पोलिस विभागाकडून ऑनलाइन परवानगी ही मुख्य असून, त्या व्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभाग, धर्मदाय आयुक्त, महावितरण आणि जागामालक आदींची परवानगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना घेणे बंधनकारक असते. यावर्षी अशाप्रकारची मोठी बैठक झालेली नाही. 

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

दहाही पोलिस ठाण्याच्या स्तरावर सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले. आतापर्यंतच्या मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रस्त्यावर खड्डे पडल्याने मिरवणूका खड्ड्यातून काढायच्या काय? असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना विचारल्या जायचा. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेहमीच टार्गेट होत होते. मात्र, यंदा मिरवणुक निघणार नसल्याने ती ओरडही थांबली आहे. 

मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना उत्सवासाठी महावितरणकडे थकीत रक्कम भरून वीज पुरवठ्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक होते. अनेकांना परवानगी वेळेपर्यंत मिळत नव्हती. तर, बऱ्याच मंडळांची थकीत रक्कम परत मिळाली नसल्याच्या तक्रारींचा पाढा वाचल्या जात होता. यावर्षी अशा परवानगीच घेणाऱ्यांचे प्रमाण बोटावर मोजण्या इतकेच आहे. त्यामुळे संबंधित विभागालाही थोडा दिलासा मिळाला आहे.

वर्गणी मागणाऱ्यांची संख्या घटली

सार्वजनिक उत्सवासाठी बंदी आहे. कुठेही देखावे राहणार नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काही दिवसांपूर्वी गल्लीबोळात, व्यापारी संकुलामध्ये वर्गणीसाठी फिरणाऱ्यांची संख्याही घटली आहे.

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले​

छोट्या व्यवसायांवरही परिणाम

उत्सवाच्या काळात मंडप डेकोरेशन, दिव्यांची आरास, अगरबत्ती, गुलाल, पूजा सामुग्री, सुशोभीकरणाच्या वस्तू विक्रीची दुकाने चौकाचौकात दिसायची. मिरवणुकांच नसल्याने गुलालाची उधळण थांबली आहे. त्यामुळे अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top