सण, उत्सवाच्या काळात परीक्षा नकोच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अमरावती : धार्मिक सणांच्या काळात शाळांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित करू नये, असे आदेश अवर सचिवांकडून शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. राज्यात साजरे होणारे धार्मिक सण, उत्सव या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांच्या सुट्यांच्या नियोजनाबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी स्थानिक ठिकाणच्या गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघाच्या परवानगीने गणेशोत्सव, दिवाळी, पर्युषण पर्व, नाताळ, ईद तसेच अन्य सणांच्या कालावधीत चाचणी परीक्षेचे आयोजन करू नये, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अमरावती : धार्मिक सणांच्या काळात शाळांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित करू नये, असे आदेश अवर सचिवांकडून शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. राज्यात साजरे होणारे धार्मिक सण, उत्सव या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांच्या सुट्यांच्या नियोजनाबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी स्थानिक ठिकाणच्या गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघाच्या परवानगीने गणेशोत्सव, दिवाळी, पर्युषण पर्व, नाताळ, ईद तसेच अन्य सणांच्या कालावधीत चाचणी परीक्षेचे आयोजन करू नये, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चिमुकल्यांना आता सण, उत्सव काळात परीक्षेपासून सुटका मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No school Examination during festivals