वंचित बहुजन आघाडीत फूट नाही : अर्जुन सलगर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

अमरावती : वंचित बहुजन आघाडीमधून एमआयएम बाहेर पडण्याची घोषणा जरी प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केली असली; तरी अद्याप बाळासाहेब आंबेडकर व खासदार असदुद्दीन औवेसी या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. येत्या काही दिवसांत यासंदर्भात निर्णय होणार असून वंचितमध्ये फूट पडल्याची चर्चा निरर्थक आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडी देखरेख समितीचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर यांनी शनिवारी (ता. 7) पत्रकार परिषदेत दिली.

सलगर म्हणाले की, आघाडी ही खासदार जलील यांच्या परवानगीने झालेली नाही. बाळासाहेब आंबेडकर व खासदार औवेसी या उभयत्यांमध्ये याबाबत लवकरच चर्चा केली जाणार आहे. वंचित आघाडीच्या विधानसभेच्या 50 उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे. आम्ही एमआयएमसाठी 17 जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे त्यांनी सांगितले. भाजप तसेच संघाचे पदाधिकारी ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. या संदर्भातील शासकीय आदेश त्याचा पुरावा आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. अशा स्थितीत ओबीसी संवर्गाने आपल्या हक्‍कासाठी जागरूक राहून सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडावा, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. पत्रकार परिषदेला ओमप्रकाश अंबाडकर, प्रा. चरणदास सियाले, नयन मोंढे, मिलिंद वाघळे, श्रीकृष्ण माहोरे, अलीम पटेल आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no split in vanchit Bahujan Front : Arjun Salgar