सीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे?: मोहन भागवत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नागपूर: युद्ध नसतानाही देशाचे जवान हुतात्मा होत आहेत. युद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे ? पण हे घडत आहे. हे थांबवायचे असेल तर आपल्या प्रत्येकाला देशाला मोठे करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नागपूर: युद्ध नसतानाही देशाचे जवान हुतात्मा होत आहेत. युद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे ? पण हे घडत आहे. हे थांबवायचे असेल तर आपल्या प्रत्येकाला देशाला मोठे करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

युद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे ? पण हे घडत आहे. हे रोखण्यासाठी समाज म्हणून आपल्याला पावले उचलावी लागतील आणि पुन्हा आपल्या देशाला महान बनवावे लागेल. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी देशासाठी बलिदान देण्याची वेळ होती. स्वातंत्र्यानंतर युद्धाच्या प्रसंगात प्राणांचे बलिदान द्यावे लागते. पण आपल्या देशात युद्ध सुरु नसतानाही सैनिक हुतात्मा होत आहेत. आपण आपले काम व्यवस्थित करत नसल्यामुळे हे घडत आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले.

भारतासह इस्राईल आणि जपानने एकाच वेळी स्वातंत्र्योत्तर प्रवासाला प्रारंभ केला. यातील दोन देशांनी 70 वर्षांत बरीच प्रगती साधून घेतली. मात्र, त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या संपन्न असतानाही भारताला हवा तसा विकास साधता आला नाही. भारताच्या विकासाची एकूणच गती संथ असल्याची खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्‍त केली.

डॉ. भागवत म्हणाले की, इस्राईल 1948 साली स्वतंत्र झाला. त्यानंतर आठ देशांनी त्यावर आक्रमण केले. तरी या देशाने प्रत्येक संकटावर मात करीत वाळवंटाचे नंदनवन केले. आता इस्राईलचे कृषी विकासाचे मॉडेल जगात सर्वश्रुत असून, त्यांच्याकडे वाकडी नजर करणाऱ्यांचे काय होते हे साऱ्यांना माहीत झाले आहे. जपानचेही असेच आहे. चारही बाजूने समुद्र असतानाही आर्थिक क्षमता निर्माण करून त्यांनी विकास साधला. आज चीनसोबत पंगा घेण्याची त्यांची ताकद आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारताच्या तिजोरीत तीस हजार कोटी होते व इंग्लंडकडून 1600 कोटी घेणे बाकी होते तरी आपल्या देशाचा आज हवा तसा विकास बघायला मिळत नाही.

भविष्य तरुणांच्या हाती
महागाई व बेरोजगारी सामान्य माणसाने वाढवली नसताना त्याचा त्रास सर्वांना होत आहे. आपण सहन करत जगतो आहोत तसेच आपल्या मुलांनाही शिकविण्याची गरज आहे. कारण देश तरुणांचा असल्याने येत्या 30 वर्षांत या भारताचे भविष्य तरुणांच्या हाती राहील. पुढील पाच वर्षांत त्याची चिन्हे दिसतील, असेही ते म्हणाले.

Web Title: no war but still soldiers are dying on border sys rss chief dr mohan bhagwat