esakal | नवी इमारत असून वसतिगृह किरायाच्या खोलीत, पाण्याची सोयच नसल्याने करायचे काय?
sakal

बोलून बातमी शोधा

no water supply in news building of hostel in gadchandur of chandrapur

गडचांदूर शहर हे कोरपना, जिवती या दोन तालुक्‍यांतील मध्यभागी आहे. येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. आदिवासीबहुल परिसर आहे. शहरात आदिवासी  मुलींचे शासकीय वसतिगृह 1993 मध्ये तर मुलांचे 2003 मध्ये शासनाने सुरू केले.

नवी इमारत असून वसतिगृह किरायाच्या खोलीत, पाण्याची सोयच नसल्याने करायचे काय?

sakal_logo
By
दीपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर) :  आदिवासी बांधवांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. गडचांदुर शहरात आदिवासी मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी वसतिगृहाची निर्मिती शासनाने केली. मात्र, पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने वसतिगृहाच्या नवीन इमारत गेल्या अडीच वर्षांपासून धूळखात पडली आहे. मुलींचे 27, तर मुलांचे 17 वसतिगृह किरायाच्या खोलीत सुरू आहे. आतापर्यंत किरायावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. 

हेही वाचा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; उपराजधानीत युवकाला अटक

गडचांदूर शहर हे कोरपना, जिवती या दोन तालुक्‍यांतील मध्यभागी आहे. येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. आदिवासीबहुल परिसर आहे. शहरात आदिवासी  मुलींचे शासकीय वसतिगृह 1993 मध्ये तर मुलांचे 2003 मध्ये शासनाने सुरू केले. कित्येक वर्षांपासून ते किरायाच्या इमारतीत सुरू आहे. आतापर्यंत लाखो रुपये किरायापोटी देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या दृष्टीने वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली. या वसतिगृहाचे काम 2018 मध्ये पूर्ण झाले. वसतिगृहाच्या ठिकाणी दोन बोअरवेल मारण्यात आल्या. मात्र, पाणी न लागल्याच्या कारणामुळे सुसज्ज असलेली इमारत धूळखात पडली आहे. इमारत बंद अवस्थेत असल्याने बरेच नुकसान झाले. वसतिगृहाची इमारत बांधून तयार आहे. मात्र, पाण्याची सुविधा नसल्याने ती अद्याप खुली करण्यात आली नाही. गडचांदुरात शिक्षणासाठी येणाऱ्यांना किरायाच्या खोलीतच राहावे लागत आहे. गडचांदुर शहरात माणिकगड सिमेंट कंपनीच्या बाजूला आदिवासी मुला मुलींच्या वसतिगृहाची वेगवेगळी निर्मिती करण्यात आली. सुसज्ज इमारत बांधकाम करण्यात आले असले तरी पाण्याची सुविधा तिथे नाही. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून इमारत धूळखात पडलेली आहे. इमारतीच्या खिडक्‍यांना असणारे काच फुटले.  इमारतीत धुळीचा थर जमा झालेले आहे.

हेही वाचा - नवनीत राणा यांचा २५ श्रेष्ठ खासदारांमध्ये समावेश; आशिया पोस्ट फेम इंडियाचा सर्व्हे

ओबीसींना वसतिगृहाची प्रतीक्षा -
कोरपना, जिवती तालुक्‍याच्या शेवटच्या गावाचे अंतर बरेच आहे. तेथून  ये-जा करणे विद्यार्थ्यांना शक्‍य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुली आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडून देतात. तालुक्‍यातील अनेक गावांत हायस्कूलपर्यंतच शाळा आहे. शिक्षणासाठी त्यांना गडचांदुरला यावे लागते. अनेक पालक शहराला पसंती देतात. येथे ओबीसींच्या मुल-मुलींनासुद्धा वसतिगृह नाही.

loading image