खासदार संजय धोत्रे, बाळू धानोरकर यांना नोटीस

file photo
file photo

नागपूर  : अकोला येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांच्याविरुद्ध मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी, तर चंद्रपूर येथील कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बुधवारी या प्रकरणात संजय धोत्रे व धानोरकर यांना नोटीस बजावून 30 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. लोकसभेच्या अकोला व चंद्रपूर मतदारसंघातील निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील निवडणूक रद्द करून त्या ठिकाणी नव्याने निवडणूक घ्यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. निहालसिंग राठोड यांनी कामकाज पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com