कुख्यात गुंडांची टोळी अटकेत

file photo
file photo

नागपूर : तीक्ष्ण शस्त्रे घेऊन रात्रीच्या अंधारात दारू पीत बसलेल्या पाच कुख्यात गुंडांना पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्यामुळे त्यांचा कुठेतरी दरोडा किंवा लूटमार करण्याचा डाव पाचपावली पोलिसांनी उधळून लावला.
सद्दाम खान अजीज खान (25) नवीन नकाशा, लष्करीबाग, सिकंदरखान ऊर्फ सोनू शरीफखान (26) महेंद्रनगर, अभय अजय हजारे (19) ठक्ककरग्राम बापूकुटी, विक्रम रामभजन शाहू (20) बाळाभाऊपेठ आणि जय राजेश नगराळे (19) बाबा बुढाजीनगर अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. मंगळवारच्या मध्यरात्री पाचपावलीचे पोलिस अशोक मेश्राम यांचे पथक परिसरात पॅट्रोलिंग करीत होते. त्यावेळी व्हिनस हॉस्पिटलमागे बलवंतसिंग सॉ मिलसमोरील मोकळ्या जागेत काही जण संशयास्पद अवस्थेत बसून आहेत, अशी माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. त्यावरून सावधगिरी बाळगत पोलिस पथक घटनास्थळी गेले. पाचही गुंड दारू पीत कुठेतरी गुन्हा करण्याची चर्चा करीत होते. पोलिसांनी घेराव करून त्यांना पकडले. त्यांच्याजवळून दोन तलवारी, चाकू, भाल्याचे पाते, नायलॉन दोरी अशी शस्त्रे जप्त केली. या प्रकरणी पाचही गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पाचही गुंडांची 26 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली. सद्दाम खानविरुद्ध पाचपावली ठाण्यात 5, सिकंदरखानवर 2, अभय हजारेवर 5, विक्रमवर 1 आणि जयवर 1 गुन्हा दाखल आहे. ही कारवाई ठाणेदार अशोक मेश्राम, सहायक निरीक्षक सूरज सुरोशे, उपनिरीक्षक मनीष गोडबोले, चिंतामण डाखोळे, छगन शिंगणे, शिपाई रविशंकर मिश्रा, विजय जाने, विश्वास बलादे, प्रवीण वाकोडे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com