शब्‍द क्‍या जानें, अर्थ की भाषा...लॉकडाउनमध्ये रोजच्‍या बोलण्यात या नवीन शब्‍दांचा वापर

निखिल देशमुख
बुधवार, 20 मे 2020

गेल्‍या काही दिवसापूर्वी आलेल्‍या कोरोना आणि लॉकडाउन या दोनच शब्‍दांनी अवघे विश्‍व हादरले आहे. कोरोना विषाणूच्‍या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउन सुर असून प्रशासनाकडून या विषाणूला रोखण्यासाठी उपायोजना सुरू आहेत.

खामगाव (जि.बुलडाणा) : कोरोनाचा संसर्ग रोखण्साठी लावण्यात आलेले लॉकडाउनमुळे अनेक गोष्टी पहिल्‍यांदा घडत आहेत. तर काही गोष्टी अंगवळणी पडत आहेत. त्‍यापैकी एक म्‍हणजे आजकाल आपल्‍या रोजच्‍या बोलण्यात वापरण्यात येणारे काही नवीन शब्‍द. भाषा दर कोसाला बदलते असा एक विचार आहे. परंतु आजकाल दर दिवसाला काही नवीन शब्‍द रोजच्‍या बोलण्यात रुढ होत आहेत. अनेकांना याचा अर्थही उमजत नसला तरी सुध्दा अंगवळणी पडलेले हे शब्‍द अनेक जण सर्रास बोलतांना दिसत आहेत.

गेल्‍या काही दिवसापूर्वी आलेल्‍या कोरोना आणि लॉकडाउन या दोनच शब्‍दांनी अवघे विश्‍व हादरले आहे. कोरोना विषाणूच्‍या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउन सुर असून प्रशासनाकडून या विषाणूला रोखण्यासाठी उपायोजना सुरू आहेत. तर दुसरीकडे भाषेचा विचार करता मराठी भाषेच्‍या व्‍यवहारात इंग्रजी भाषेतील शब्‍दांचा वापर अधिक वाढला असल्‍याचे दिसून येत असून यामध्ये अनेक नवीन शब्‍द सर्रास वापरले जात आहेत.

आवश्यक वाचा - Video : अखेर पोलिसांनी डागली कारवाई तोफ, बेकायदेशीर सुरू होता हा व्यवसाय

महानगरे, शहरे आणि खेड्यांतही कोरोना आणि लॉकडाउन हे दोन शब्‍द तर खुपच प्रचलित झाले आहेत. आपल्‍याकडे एक म्‍हण प्रचलित आहेत ‘शब्‍द क्‍या जाने, अर्थ की भाषा’याच म्‍हणी प्रमाणे अनेकांना या शब्‍दांचा अर्थही कळत नसला तरी अनेकांकडून गावखेड्यात सुरू असलेल्‍या चर्चेत सर्रास हे शब्‍द उच्चारले जातात व परिस्‍थितीची जाणीव असल्‍याचे सिध्द केले जात आहे. 

हेही वाचा - हृदयद्रावक! सुखी संसार अचानक विस्कटला अन् विवाहितेसह दोन चिमुकल्यांनी विहिरीत...

हे आहेत नवीन शब्द
या शब्‍दांमध्ये सॅनिटायझर, मास्‍क, स्‍वॅब, क्‍वॉरटाईन, होम क्‍वाॅरंटाईन, पीपीई किट, वर्क फॉर्म होम, कोविड हॉस्‍पिटल, आयासोलेशन वॉर्ड, सोशल डिस्‍टसिंग, फिजिकल डिस्‍टन्‍सिंग, लॉकडाउन, वेबिनार, व्‍हायरस, स्‍टे होम, कोविड सेंटर, हॅन्‍डवॉश, हॅन्‍डग्‍लोज, रेड,ऑरेंज, ग्रीन झोन, पॉझिटिव्‍ह, निगेटिव्‍ह, एरिया सिल, सॅनिटायझेशन अशा विविध शब्‍दांचा वापर रोजच्‍या भाषेत आढळून येत आहे.

मराठी भाषेवर इंग्रजीचे अतिक्रमण
लॉकडाउन काळात अनेक नवीन शब्‍द रोजच्‍या वापरात येत आहेत. यापुर्वी कधी या शब्‍दाचा वापर झालेला असेलही परंतु आता रोजच होत आहे. सरकारी कामकाजात या शब्दाचा वापर म्हणजे मराठी भाषेवर इंग्रजीचे अतिक्रमण होत आहे. आपला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असून राजभाषा मराठी आहे. याचे भान ठेवले पाहिजे. मराठी भाषेचाच वापर कामकाजात व व्यवहारात झाला पाहिजे.
-विलास इंगळे, मराठी भाषा संरक्षक व भाषा सेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now a days everyday some new words are becoming commonplace in lockdown