
वर्धा : गेल्या 2019 च्या जानेवारी ते डिसेंबर महिन्यादरम्यान डेंगी आजाराची 79 प्रकरणे होती. यात तिघांचा मृत्यू झाला होता. यामुळे आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. देशात 16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंगी दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्या अनुषंगाने येत्या काळात खबरदारी पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
डेंगी ताप प्रादुर्भाव नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहे. डेंगी ताप हा विषाणूजन्य आजार एडिस इजिप्टाय डासाच्या मादिच्या चाव्यामुळे होतो.
या डासाची उत्पत्ती आपल्या घरी रांजन, सिमेंट टाके, इमारतीवरील टाक्या, घरावरील प्लास्टिक, छत घराभोवतालच्या टाकाऊ वस्तू, प्लास्टिक, बकेट, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरुपयोगी टायर, इलेक्ट्रॉनिक कचरा कुलर फ्रीजचा स्ट्रेमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात डासअळींची उत्पत्ती होत असते. पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवल्यास हा डास अंडी घालून अळी व कोषानंतर डासात रूपांतर होत असते. त्यासाठी पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त साठवू नये ही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
डेंगी हा आजार चार प्रकारचा असून त्याची लक्षणे एकाएकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपण, भूक मंदावणे, डोळे लाल होणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढउतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव होणे, रक्तमिश्रित किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे अशी आहेत.
डेंगी ताप टाळण्यासाठी पाणी साचू देऊ नये. घराच्या अवती-भवती साचलेले पाणी तर नाही ना, याची नियमित खातरजमा करावी. कूलरची टाकी, पक्ष्यांचे पिण्याचे भांडे, फ्रीजचा ट्रे इत्यादी ठिकाणी डासाची मादी अंडी घालतात. ताप आल्यास पॅरॉसिटामॉल घेता येते. स्वत: एस्प्रिन व ब्रुफेनचा वापर करू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
नागरिकांनी कोरड दिवस पाळावा
पावसाळा जवळ आला आहे. याच काळात डेंगीवा उद्रेक होतो. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरड दिवस पाळावा, शौचालयाच्या पाइपवर जाळ लावावा. छोटी छोटी खबरदारी घेतल्यास या आजारावर प्रतिबंध घालता येईल.
- डॉ. अजय डवले
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.