विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा आता महाविद्यालयीन स्तरावर; विद्यापीठ विद्या परिषदेचा महत्वपूर्ण निर्णय

सुरेंद्र चापोरकर 
Friday, 23 October 2020

कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाची विद्या परिषदेची सभा ऑनलाईन पद्धतीने झाली.  या सभेमध्ये अंतीम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन (एम.सी.क्यु.) पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने संबंधित महाविद्यालयांना घ्यावयाची आहे.

अमरावती  : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 अंतीम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन/ऑफलाईन व असाईनमेंट अशा पद्धतीने घेण्याचा निर्णय आज झालेल्या विद्या परिषदेमध्ये एकमताने घेण्यात आला.  

कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाची विद्या परिषदेची सभा ऑनलाईन पद्धतीने झाली.  या सभेमध्ये अंतीम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन (एम.सी.क्यु.) पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने संबंधित महाविद्यालयांना घ्यावयाची आहे.  एम.सी.क्यु. पद्धतीने पेपर सुद्धा संबंधित महाविद्यालयांना सेट करावयाचे असून  40 प्रश्नांचा पेपर असेल, 

जाणून घ्या - अबब! नागपुरात जन्माला आले चक्क पाच किलो वजनाचे बाळ

त्यापैकी 20 प्रश्न विद्याथ्र्याला सोडवावे लागतील.  परीक्षा एक तासाची राहणार असून परीक्षेचा टाईम-टेबल संबंधित महाविद्यालय स्तरावर तयार होणार आहे.  संबंधित महाविद्यालयाला उन्हाळी 2020 च्या सर्व अंतीम वर्षाच्या परीक्षा  2 नोव्हेंबरपर्यंत घ्याव्या लागणार आहेत.  सर्व संबंधित विद्याथ्र्यांना परीक्षेसंदर्भात आपल्या महाविद्यालयांशी संपर्क तातडीने साधावयाचा आहे.

परीक्षा झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयाला तातडीने विद्याथ्र्यांचे गुण विद्यापीठाला पाठवावे लागणार असून जास्तीतजास्त 5 ते 6 नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांना गुण पाठविण्याची अंतीम तारीख असून, त्यानंतर 8 नोव्हेंबरपासून परीक्षांचे निकाल विद्यापीठाकडून जाहीर होतील.   20 ऑक्टोबर, 2020 रोजी ऑनलाईन पद्धतीने ज्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्या रद्य करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या सभेत घेण्यात आला.

अंतीम सत्राच्या विद्याथ्र्यांच्या अनुशेषाच्या परीक्षा असाईनमेन्ट पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.   विद्याथ्र्यांनी संबंधित परीक्षेतील विषयाचे असाईनमेन्ट पूर्ण करून आपल्या महाविद्यालयाला विहित मुदतीत सादर करावयाचे असून महाविद्यालयांना विद्याथ्र्यांनी सादर केलेल्या असाईनमेन्टचे मूल्यांकन करून त्याचे गुण जास्तीतजास्त 5 नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठाला पाठवावयाचे आहेत.

सविस्तर वाचा -  Video गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप

शासनाचे निर्देश आणि गुणवत्ता ठेवून परीक्षा घेण्यात येणार असून त्या संदर्भातील सविस्तर निर्देश परीक्षा विभगाकडून संलग्नित महाविद्यालयांना तातडीने पाठविले जाणार आहे.  सर्व महाविद्यालयांचे सहकार्य यासाठी निश्चितपणे मिळणार, असा विश्वास कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केला.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now exams of Amravatu university held at college level