शासकीय कर्मचाऱ्यांनो, आता कामाला येताना हेल्मेट आणायला विसरू नका; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

श्रीकांत पशेट्टीवार 
Friday, 29 January 2021

या आदेशाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी हा मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. त्यांची गंभीर नोंद घेण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

चंद्रपूर ः जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि सर्व शासकीय यंत्रणेत कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी हा मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. त्यांची गंभीर नोंद घेण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

हेही वाचा - रक्तबंबाळ अवस्थेत शेतात पडून होती तरुणी; काकानं खांद्यावर घेत पायी पार केलं तब्बल ३...

मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा, नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता दरवर्षी देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सोबत राज्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येतो. मोटार वाहन अधिनियमानुसार कोणतेही दुचाकी वाहन रस्त्यावर चालविताना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे आहे. 

तसेच वेळोवळी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेदेखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याबाबत निर्णय दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले आहे. 

हेही वाचा- क्षुल्लक वाद अन् भरचौकात मांडीवर चाकूनं केला वार; वाचून तुमच्याही अंगाचा उडणार थरकाप  

जिल्ह्यातील इतर सर्व खासगी क्षेत्रातील आस्थापना, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, एमआयडीसी, शाळा, महाविद्यालय व कंपन्या यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरासंबंधी प्रवृत्त करावे. यासाठी व्यवस्थापकीय स्तरावर नियंत्रण ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी त्यांना विनंती केली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Helmet is compulsory to Government employees in Chandrapur