म्हणून आता मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यांतही होणार "आकाशवाणी'!

Radio
Radio

गौरखेडा बाजार (जि. अमरावती)  : आपल्या श्रोत्यांना विविध मनोरंजनाचे कार्यक्रम अगदी स्पष्टपणे ऐकता यावे यासाठी अमरावती आकाशवाणीने एक नवे ऍप सुरू केले आहे. हे ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर डोंगरदऱ्यांनी युक्त आदिवासी आणि मागास समजल्या जाणाऱ्या मेळघाटच्या घराघरांतून आकाशवाणीचा सुमधूर आवाज आता गुंजणार आहे. 

रेडिओ नावाचा आविष्कार 
गेल्या शतकापर्यंत म्हणजे सुमारे 100 वर्षांपूर्वी लोकांच्या मनोरंजनासाठी कुठलेच साधन नव्हते. त्यानंतर विज्ञानामुळे नवनवे तंत्रज्ञान विकसित होत गेले आणि एक दिवस रेडिओ नावाचा आविष्कार उदयास आला. या रेडिओने मानवाच्या जीवनात आमुलाग्र बदल केला. 1920 साली सुरू झालेल्या आकाशवाणी केंद्रात काळानुसार अनेक सकारात्मक बदल झाले.

आकाशवाणीचे मोबाईल ऍप
सोशल मीडियाच्या वाढत्या स्पर्धेत अमरावती आकाशवाणी केंद्राने सुद्धा एक पाऊल पुढे टाकत स्वतःचे मोबाईल ऍप सुरू केले. त्यामुळे खरखर येणारा आवाज आता सुमधूर येऊ लागला आहे. या ऍपच्या निर्मितीमुळे ठराविक वेळेत ऐकल्या जाणाऱ्या रेडिओवरील व दूरदर्शनवरील बातम्या किंवा कार्यक्रम आता केव्हाही आणि कुठेही ऐकले वा पाहू शकणार आहे. 

कोरकू आदिवासींचा मेळघाट 
28 ऑक्‍टोबर 2019 ला अमरावती आकाशवाणीने "एआयआर न्यूज' हे अनोखे ऍप श्रोत्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. हे ऍप वापरायला साधे आणि अधिक सोपे असल्याने त्याला श्रोत्यांची मोठी पसंती आहे.

मोबाईल टॉवर उभारले
कुपोषणासह विकासात मागास असलेल्या कोरकू आदिवासींच्या या मेळघाटमध्ये सर्वप्रथम मोबाईल नेटवर्कची समस्या होती. मात्र, आता दूरसंचार विभागासह अनेक मोबाईल कंपन्यांनी या भागात मोबाईल टॉवर उभारले. त्यामुळे मेळघाटमधील प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात आता मोबाईल पोहोचला आहे.

आदिवासी ऐकणार समधूर आवाज
या मोबाईलमध्ये आकाशवाणीचे ऍप डाऊनलोड केल्यानंतर मेळघाटातील दऱ्याखोऱ्यांत वसलेल्या गावांमध्ये सुद्धा आता "आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे' असा समधूर आवाज आदिवासी बांधव ऐकणार आहेत. 

अनेक कार्यक्रमांची रेलचेल 
अमरावतीच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये गीतांचा कार्यक्रम, प्रेरणादायी व्यक्तीच्या मुलाखती, महिलांचे कार्यक्रम, तरुणांसाठी मार्गदर्शन यांसह इतरही अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रसारित केले जातात. अमरावती आकाशवाणीचे नवे ऍप सुरू झाल्याने श्रोत्यांनी समाधान व्यक्त केले आहे, असे केंद्रप्रमुख एकनाथ नागडे यांनी सांगितले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com