दिलासादायक : राज्यात टँकरची संख्या मागील वर्षी होती पावणेपाच हजार अन् आता केवळ...

water tankar.jpg
water tankar.jpg

अकोला : एप्रिल महिन्याच्या शेवटी राज्यातील सर्वच शहरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. मात्र, मागील वर्षीपेक्षा यंदा पाणीटंंचाईची तीव्रता कमी आहे. राज्यात सद्यस्थितीत 170 टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी याच वेळेला ही संख्या 4 हजार 774 ऐवढी होती. पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसाचा परिणाम आता उन्हाळ्यात दिसून येत आहे.

राज्यात रखरखते ऊन आणि पाणीटंचाई हे दोन विषय नित्याचेच. मात्र, यंदा मॉन्सूनने लावलेली दमदार हजेरी शेतकऱ्यांना दिलासादायक ठरली आहे. अति पावसामुळे खरिपात जरी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तरी रब्बीत याच पाण्याचा चांगला फायदा झाला आहे. या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहले तसेच शेततळे, तलाव व विहिरी तुडूंब भरल्या होत्या. त्याचाच परिणाम पिकांवर दिसून आला. गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे राज्यातील अनेक धरणांसह तलाव, विहिरींतील पाणीसाठाही तळाला गेला होते. त्यामुळे टॅंकरने मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा वाढला होता.

आता एप्रिलचा शेवटचा आठवडा असून, सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. परंतु यंदा पाणीटंचाईचे चटके कमी प्रमाणात दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मागील वर्षी राज्याची भिस्त 4 हजार 774 टॅंकरवर अवलंबून होती. ती दिवसागणिक वाढत गेली. मात्र, यंदा वरूण राजाची कृपादृष्टी झाल्याने पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. परिणामी, यावर्षी आतापर्यंत राज्यात केवळ 170 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही स्थिती पाहता पुढील काळातही पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - नशेसाठी सॅनिटायझरचा एक घोट ठरू शकतो घातक​

जनावरांच्या पाण्याचाही प्रश्‍न मिटला
दमदार पावसामुळे नागरिकांबरोबर जनावरांच्याही पाण्याचा प्रश्‍न बऱ्यापैकी मिटला. मागील वर्षी जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध नसल्याने काही शेतकरी जनावरे कवडीमोल दराने विकावे लागले होते. तर काही शेतकऱ्यांनी बाहेरच्या जिल्ह्यात स्थलांतरासाठी पाठवत होते.


22 जिल्ह्यांत शुन्य टॅंकर
यंदा पावसाळा चांगलाच लांबल्याने दीर्घकाळ पाऊस सुरू होता. परिणामी, प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या राज्यातील 22 जिल्ह्यांत एकही टॅंकर सुरू नाही. तरी अनेक ठिकाणी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर पडून आहेत.


विभागनिहाय टॅंकर संख्या
विभाग       टॅंकर संख्या 

ठाणे         68 
नाशिक      13 
पुणे          4 
औरंगाबाद   78
अमरावती   4 
नागपूर       3
एकूण       170 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com