esakal | गडचिरोलीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत होतेय घट; उरलेत फक्त ६४२ रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

numbers of corona patients are decreasing in gadchiroli

गुरुवारी गडचिरोली जिल्ह्यात 38 नवीन बाधित आढळून आले असून 93 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

गडचिरोलीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत होतेय घट; उरलेत फक्त ६४२ रुग्ण 

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : काही दिवसांपूर्वी कोरोना बाधितांच्या संख्येचे शतक गाठले जात असताना मागील आठवडाभरापासून बाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (ता. 12) जिल्ह्यात केवळ 38 नवे कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हावासींसाठी ही सुखावणारी बाब ठरली आहे.

गुरुवारी गडचिरोली जिल्ह्यात 38 नवीन बाधित आढळून आले असून 93 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 6 हजार 733 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6 हजार 24 वर पोहोचली. तसेच सध्या 642 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 67 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. गुरुवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.47 टक्‍के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 9.54 टक्‍के तर मृत्यू दर 1 टक्‍के झाला. नवीन 38 बाधितांमध्ये गडचिरोली 17, अहेरी 3, आरमोरी 6, भामरागड 2, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 2, सिरोंचा 0 व वडसा येथील 2 जणांचा समावेश आहे. गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्या 93 रुग्णांमध्ये गडचिरोली 28, अहेरी 18, आरमोरी 3, भामरागड 9, चामोर्शी 6, धानोरा 4, एटापल्ली 2, मुलचेरा 4, सिरोंचा 2, कोरची 4, कुरखेडा 5, वडसामधील 8 जणांचा समावेश आहे. 

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्‍यातील रामनगर 4, स्नेहानगर 3, हनुमान वॉर्ड 1, हिरापूर 1, अडपल्ली 1, रेड्डी गोडाऊन 1, आशीर्वादनगर 1, सोनापुर कॉम्प्लेक्‍स 1, रामपुरी वॉर्ड कॅम्प एरिया 1, पोर्ला 1, फुले वॉर्ड 1, कन्नमवारनगर 1, अहेरी तालुक्‍यातील बाधितांमध्ये स्थानिक 2, आलापल्ली 1, आरमोरी तालुक्‍यातील बाधितांमध्ये स्थानिक 4, वडधा 1, डोंगरगाव 1, भामरागड तालुक्‍यातील बाधितांमध्ये धोडराज 2, चामोर्शी तालुक्‍यातील बाधितांमध्ये आष्टी 1, स्थानिक 1, क्रिष्णनगर 1, धानोरा तालुक्‍यातील बाधितांमध्ये आरएच 1, एटापल्ली तालुक्‍यातील बाधितांमध्ये स्थानिक 2, मुलचेरा तालुक्‍यातील बाधितांमध्ये खुदीरामपल्ली 1, तसेच वडसा तालुक्‍यातील बाधितांमध्ये शंकरपुर 2 असा समावेश आहे. कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होत असली, तरी कोरोना संसर्गासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे अतिशय आवश्‍यक आहे.

क्लिक करा - पितळ पडले उघड; सरकार ४२६ शेतकऱ्यांकडून ३६ लाख रुपये करणार वसूल

अशी आहे आकडेवारी...

मागील आठवड्यावर नजर टाकल्यास 5 नोव्हेंबर रोजी 92 कोरोनाबाधित आढळले, तर दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी 83 बाधित आढळून आले, तर दोन कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले. 7 नोव्हेंबर रोजी 71 कोरोनाबाधित आढळले, 8 नोव्हेंबर 74 कोरोनाबाधित, तर एकाचा मृत्यू, 9 नोव्हेंबर 34 कोरोनाबाधित आढळले. 10 नोव्हेंबर रोजी 51 बाधित व एकाचा मृत्यू झाला. 11 नोव्हेंबर रोजी 58 कोरोनाबाधित आढळले. तर गुरुवार 12 नोव्हेंबर रोजी 38 कोरोनाबाधित आढळले आहेत.
 
संपादन - अथर्व महांकाळ