परिचारिका होणार आता स्मार्ट

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

नागपूर - मातेपेक्षाही वत्सलतेने रुग्णांची सुश्रुषा करणाऱ्या परिचारिकांची "स्मार्ट' होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. डॉक्‍टरांप्रमाणे परिचारिकांनाही इंडियन मेडिकल परिषदेने नोंदणी बंधनकारक केली आहे. यामुळे महाराष्ट्र परिचर्या परिषदेने पुढाकार घेत स्मार्ट नर्स ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. आगामी परिषदेच्या वेबसाइटवर 31 मार्च 2017 पूर्वी नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

राज्यात 16 वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे साडेबारा हजार परिचारिका कार्यरत आहेत. उपचारात तसेच शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्‍टरांना पूरक मदत करणाऱ्या परिचारिकांकडूनच रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळावी. तसेच परिचारिकांना कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र परिचर्या परिषदेतर्फे परिचारिकांना स्मार्ट कार्ड नोंदणी बंधनकारक केली आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाशी संलग्न असलेल्या साडेबारा हजार परिचारिकांसह राज्यात आरोग्य विभागाशी संबंधित सुमारे 15 हजारांपेक्षा अधिक परिचारिका आहेत. राज्यात सुमारे 30 ते 35 हजार परिचारिकांची नोंदणीला सुरवात झाली आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) कार्यरत परिचारिकांच्या नोंदणीसाठी खुद्द मेडिकलच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी वहाणे आणि मेट्रन मालती डोंगरे यांनी पुढाकार घेतला आहे. नोंदणी करण्यासाठी परिचारिका गेल्या तर रुग्ण तपासणी तसेच इतर कामे प्रभावित होण्याची भीती आहे. यामुळे मेयो रुग्णालयात "साफ्टवेअर'ची व्यवस्था करण्यात आली. यामुळे
आरोग्यसेवेवर कोणताही परिणाम न होता परिचारिकांची नोंदणी होईल. महाराष्ट्र मेडिकलच्या धर्तीवर महाराष्ट्र परिचर्या परिषदेकडून होणारी परिचारिकांची नोंदणी करण्याचा उपक्रम भविष्यात लाभदायी ठरणार असल्याचे मेट्रन डोंगरे म्हणाल्या. अधिष्ठाता डॉ. वहाणे यांनी मेयोत नोंदणीची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

नोंदणी न केल्यास...
महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या निर्देशानुसार परिचारिकांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्या परिचारिका नोंदणी करणार नाहीत, अशा परिचारिकांना भविष्यात परिचर्या सेवा देता येणार नाही. यामुळे नोकरीवर गदा येण्याची भीती आहे.

Web Title: Nurses will be smart