सरकारकडून "नॅट' तपासणी युनिट! 

सरकारकडून "नॅट' तपासणी युनिट! 

नागपूर : मेडिकल, मेयो, डागा व सुपर स्पेशालिटीत शासकीय रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची नॅट (न्युक्‍लिअर ऍसिड टेस्ट) तपासणीची सोय नाही. त्यामुळे एखाद्या रुग्णाला दूषित रक्त मिळून संक्रमणाचा आजार होऊ शकतो. यासंदर्भात "सकाळ'ने वृत्त प्रकाशित करताच सरकारने "नॅट' तपासणी युनिट उभारण्याचे संकेत दिले आहे. 
आधुनिक तंत्रज्ञानाच्या तपासणीतून शुद्ध व सुरक्षित रक्तच रुग्णांना मिळावे या हेतूने "नॅट' तंत्रज्ञान विकसित केले. परंतु, यापासून सरकारी रुग्णालये दूर आहेत. खासगी प्रयोगशाळा नॅट तपासणीतून व्यवसाय करीत आहे. यासंदर्भात दै. "सकाळ'ने "नॅट' तंत्रज्ञानाशिवाय सरकारी रक्तपेढ्या' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत सरकारने उपराजधानीतील सुपर स्पेशालीटी किंवा मेयोत तसेच पुणे येथे "नॅट' तपासणी युनिट उभारण्याचे संकेत दिले आहेत. तसे पत्र रुग्णालयाच्या विकृती विभागाकडे आल्याची माहिती आहे. तसेच नागपूरच्या सुपर किंवा मेयो येथील जागेसंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. दोन्ही संस्थांनी सरकारला माहिती पाठवली आहे. हे युनिट झाल्यास शहरातील सरकारी रक्तपेढ्यांतील रक्तपिशव्या "नॅट'द्वारे तपासण्यात येतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com