ओबीसींनी उद्योजक म्हणून पुढे यावे

ओबीसींनी उद्योजक म्हणून पुढे यावे
नागपूर ः ओबीसी समाज उद्योगात कमी पडतो. भांडवलाचीही अडचण असते. हे लक्षात घेऊनच ओबीसी विकास महामंडळातर्फे
व्यवसाय उभारण्यासाठी समुपदेशन तसेच योजनांचा प्रसार करण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. विविध योजनांसाठी महामंडळाकडे तब्बल पाच हजार कोटींचा निधी उफलब्ध असल्याची माहिती ओबीसी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिली.
ठाकरे यांनी "सकाळ' कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी ओबीसी विकास महामंडळाच्या योजना, तरुणांना थेट मंडळाकडून तसेच बॅंकेतर्फे कर्ज, केंद्राचे अनुदान आदीवर विस्तृत प्रकाश टाकत भविष्यातील नियोजनाचीही माहिती दिली. मंडळाचे 250 कोटींचे शेअर कॅपिटल आहे. त्याच्या 20 पट अर्थात पाच हजार कोटींपर्यंत विविध योजनांतून कर्ज देता येते. राज्यात ओबीसींच्या 354 जाती आहेत. परंतु अनेकांना तर त्यांचा ओबीसीमध्ये समावेश असल्याचेही माहीत नाही. अशा लोकांपर्यंत महामंडळाच्या योजना पोहोचविण्यासाठी सर्वे केला जाणार आहे. योजनांच्या प्रसार, प्रचारावर भर दिला जाणार आहे. उद्योगासाठी कर्ज घेण्याकरिता आवश्‍यक प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बॅलेन्सशीट व इतर प्रक्रियेबाबत तरुणांचे समुपदेश करण्यात येईल. बचतगटांना 50 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी महामंडळ बॅंकेला हमी देते, हीच पद्धत वैयक्तिक कर्जासाठीही आहे. कोणताही व्यवसाय उभारायचा असल्यास महामंडळ तरुणांना 25 टक्के बीज भांडवल देते. "बार्टी'च्या धर्तीवर तरुणांसाठी "महाज्योत' ही योजना असून यातून तरुणांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, विविध उद्योगाबाबत गावस्तरावर प्रशिक्षण, कृषी प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
पक्षाने म्हटल्यास "काटोल' लढू
काटोल विधानसभा मतदारसंघात भाजपची चांगली पकड निर्माण झाली आहे. मध्यंतरी येथे विस्तारकाची जबाबदारी आपल्यावर सोपविली होती. सध्या भाजपची चांगली पक्षबांधणी झाली आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास विधानसभेची निवडणूक लढण्यास आपली तयारी असल्याचे अविनाश ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com