esakal | युवतीला अश्‍लील मॅसेज; नाशिकच्या युवकास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

युवतीला अश्‍लील मॅसेज; नाशिकच्या युवकास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : आधी प्रेमप्रकरण सुरू होते. नंतर तिने टाळले. तिने टाळल्यामुळे त्याने तिच्या मोबाइलवर अश्‍लील मॅसेज पाठविने सुरू केले. त्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी दिंडोरी नाशिक येथील गणेश वसंत बोराडे(वय 27) युवकास अटक केली.
डिसेंबर 2018 मध्ये गाडगेनगर पोलिसांनी पीडित युवतीच्या तक्रारीवरून गणेश बोराडेविरुद्ध छेडखानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात महिला पोलिस उपनिरीक्षकाचे पथक दोन वेळा त्याच्या शोधासाठी नाशिक येथे जाऊन आले. परंतु गणेश याने पोलिसांना हुलकावनी दिली. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी एक शक्कल लढवून, स्वत: गणेशलाच अमरावतीत बोलावून घेतले. तो येताच, रविवारी (ता. 1) त्याला अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी गणेशचे बयाण नोंदविले असता, पीडित युवतीच्या मैत्रिणीने गणेशसोबत तिची ओळख करून दिली. ओळखीनंतर दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. परंतु तिने गणेशला टाळले. ही गोष्ट जिव्हारी लागल्यामुळे त्याने युवतीच्या मोबाईलवर अश्‍लील मॅसेज पाठविले. या प्रकाराला कंटाळलेल्या युवतीने पालकांना घटनेची माहिती दिली. गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदवून नऊ महिन्यानंतर गणेश याला अटक झाली.  

loading image
go to top