esakal | सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट भोवली
sakal

बोलून बातमी शोधा

polic halla.

दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर वाढत असून, त्यामधून आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याचे प्रमाणही वाढत आहे. दरम्यान, या पोस्टच्या माध्यमातून अनेकदा वादही निर्माण होत असल्यामुळे पोलिसांच्या वतीने विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट भोवली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर वाढत असून, त्यामधून आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याचे प्रमाणही वाढत आहे. दरम्यान, या पोस्टच्या माध्यमातून अनेकदा वादही निर्माण होत असल्यामुळे पोलिसांच्या वतीने विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- वास्तवः भाऊ, दानशूर फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात म्हणून...

पोलिसांचे आहे बारीक लक्ष
याबाबत असे की, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात दहशतवाद विरोधी पथक पोउपनी इम्रान इमानदार, पोहेकाँ साजीद शेख, पोहेकॉ श्रीकृष्ण चांदुरकर, पोकॉ सतीश जाधव व पोकॉ विजय वारुळे यांच्यासह एक विशेष पथक तयार करून करोना कोविड-19 या महामारीच्या अनुषंगाने जे व्यक्ती सोशल मीडियावर समाजामध्ये विषाणूबद्दल गैरसमज व भ्रम तथा जातीय विव्देश पसरविणारे पोस्ट प्रसारीत करून अफवा पसरवितात अशा व्यक्तींवर स्वत: सदर पथकासोबत बारीक लक्ष ठेवून होते. या दरम्यान, शासनाने केलेल्या कोरोना कोविड-19 संदर्भात केलेल्या उपाययोजना व वेळोवेळी पारीत केलेल्या सूचनांचे उल्लंघन करून सार्वजनिक उपद्रव करणाऱ्या प्रकारची समाज विघातक पोस्ट प्रसारीत करणारे राहुल भगवान बेंडवाल, अंकेश मुठ्ठे रा. बुलडाणा व फिरोज खान अमानुल्ला खान रा. नांदुरा यांची गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्यांचा शोध घेऊन त्यांनी केलेल्या पोस्टची सखोल पडताळणी केल्यानंतर त्यांच्याविराधोत बुलडाणा शहर व नांदुरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना दक्षता बाळगावी व चुकीची माहिती देणारे पोस्ट प्रसारीत करू नये अन्यथा सूचनांचे भंग करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येईल असे महेंद्र देशमुख यांनी सांगितले आहे.