बैठकीच्या नावे पदाधिकाऱ्यांची ‘पेंच टूर’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नागपूर - ग्रामीण भागातील जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा परिषदेतील सदस्यांना समस्येची जाण नाही. या समस्या जाणून घेण्यासाठी चक्‍क पेंचच्या विश्रामगृहातच स्थायी  समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रभारी सीईओ अंकुश केदार, विरोधी पक्षनेते  मनोहर कुंभारे यांची अनुपस्थिती होती. बैठकीत मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नाही. ही बैठक म्हणजे पदाधिकाऱ्यांसाठी सहलच ठरल्याची चर्चा आहे.

 ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणून जिल्हा परिषदेकडे बघितले जाते. राज्य सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमार्फतच राबविल्या जातात. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला असलेले अधिकार लक्षात घेता या समितीच्या बैठकीला फार महत्त्व आहे. सर्वसाधारण सभेनंतर अत्यंत महत्त्वाची बैठक म्हणून या बैठकीकडे बघितले जाते. साधारणपणे मुख्यालयीच स्थायी समितीची बैठक घेण्यात येते. यंदा ही बैठक मुख्यालयी न घेता पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या विश्रामगृहात आयोजित करण्यात आली. जि. प. अध्यक्ष निशा सावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिक्षण व अर्थ समिती सभापती उकेश चव्हाण यांच्यासह अनेक समिती सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. मात्र, या बैठकीला प्रभारी सीईओ अंकुश केदार, विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे,  समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी  जाण्याचे टाळले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अध्यक्ष सावरकर यांनी कुणालाही  विश्‍वासात न घेता बैठकीचे स्थळ निश्‍चित केले. त्यामुळे अनेकांनी जाण्याचे टाळले. ग्रामीण जनतेच्या दृष्टिकोनातून कोणताही महत्त्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला नसूल साधी चर्चाही झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. बैठकीच्या नावे अध्यक्षांनी सहलीचे आयोजन  करून हजारो, लाखो रुपये खर्च केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे. बैठकी संदर्भात मात्र कुणीही अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही. अध्यक्ष सावरकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न  केला असता प्रतिसाद दिला नाही. 

अध्यक्ष सावरकर यांनी पेंचला बैठक घेण्यासंदर्भात कुठलीही पूर्व सूचना दिली नाही. जिल्हा परिषदेत सर्व मनमानी कारभार सुरू आहे. 
- मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते.

Web Title: officer Pench tour