35 दिवसांत बदलले कृषी अधीक्षक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

अमरावतीः कृषी विभागाने बदली कायद्याला बाजूला सारून व विशेष बाबीच्या नावाखाली ऐन पावसाळ्यात अधिकाऱ्यांचे बदलीसत्र चालविले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांना पदोन्नती व सात अधिकाऱ्यांचे स्थानांतर दोन दिवसांपूर्वी केले.त्यानुसार, डी. एल. तांबडे (लातूर), तुकाराम जगताप आणि रवींद्र भोसले (अमरावती) या तीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी सहसंचालक या पदावर पदोन्नती देण्यात आली.श्री. तांबडे यांना पुणे तर श्री. भोसले यांना नागपूर येथे पाठविण्यात आले. पदोन्नती मिळालेले रवींद्र भोसले यावर्षी 21 जूनला पुणे येथील राष्ट्रीय फलोत्पादन विभागातून अमरावतीला बदलीवर आले होते.

अमरावतीः कृषी विभागाने बदली कायद्याला बाजूला सारून व विशेष बाबीच्या नावाखाली ऐन पावसाळ्यात अधिकाऱ्यांचे बदलीसत्र चालविले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांना पदोन्नती व सात अधिकाऱ्यांचे स्थानांतर दोन दिवसांपूर्वी केले.त्यानुसार, डी. एल. तांबडे (लातूर), तुकाराम जगताप आणि रवींद्र भोसले (अमरावती) या तीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी सहसंचालक या पदावर पदोन्नती देण्यात आली.श्री. तांबडे यांना पुणे तर श्री. भोसले यांना नागपूर येथे पाठविण्यात आले. पदोन्नती मिळालेले रवींद्र भोसले यावर्षी 21 जूनला पुणे येथील राष्ट्रीय फलोत्पादन विभागातून अमरावतीला बदलीवर आले होते. अवघ्या 35 दिवसांत त्यांना पदोन्नतीवर पाठविण्यात आले. त्यावेळी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी; तर गोंदियाचे अनिल इंगळे यांच्यासाठी आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी शिफारस केली होती. आता सव्वा महिन्याच्या अवधीनंतर इंगळे यांची अमरावतीसाठी वर्णी लागली. अमरावतीचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय मुळे गतवर्षी 31 मे रोजी लातूरला सहसंचालक कार्यालयात विभागीय अधीक्षकपदावर बदलून गेले. तेव्हापासून 20 जून 2018 पर्यंत उपसंचालक अनिल खर्चान यांच्याकडे प्रभार होता. नवनियुक्ती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे 30 जुलैला पदभार स्वीकारतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची बदली
संभाजी कडू ठाकूर (नाशिक ते जळगाव), अनिल इंगळे (गोंदिया ते अमरावती), भाऊसाहेब बऱ्हाटे (अहमदनगर ते गोंदिया), बबन नत्थू पाटील (धुळे ते नंदूरबार), ज्ञानदेव वाकुरे (मुंबई ते कोल्हापूर), बसप्पा मास्तोळी (कोल्हापूर ते जालना), अंकुश माने (रायगड ते ठाणे) यांची बदली करण्यात आली.

Web Title: officer transfer